योजना शेतकऱ्यांसाठी

या शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदीसाठी १०० % अनुदान मिळणार

Shares

भारतात शेतीस अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा मानला जातो. भारतातील ६० टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना, उपक्रम राबवत असतो. जेणेकरून शेतकरी आत्मनिर्भय (Self-reliant) होईल. शासन अल्पभूधारक (minority farmers) तसेच भूमिहीन शेतकऱ्यांसाठी ( landless farmers) अनेक विविध योजना राबवत असतो. अश्याच एका योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतजमीन (Farmland) खरेदी करण्यासाठी १०० % अनुदान दिले जात आहे. आपण जाणून घेऊयात काय आहे ही योजना . ही योजना म्हणज़े दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान नामक योजना (Dadasaheb Gaikwad Empowerment and self-esteem) होय. ही योजना २०१८ ला सुरु झाली असून या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

हे ही वाचा (Read This ) युरिया ऐवजी याची फवारणी करून मिळवा अधिक उत्पन्न.

या अनुदानासाठी कोण पात्र आहे ?
दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी १०० टक्के अनुदान मिळणारा आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती अंतर्गत येणाऱ्या भूमिहीन शेतमजूर, विधवा महिला, दारिद्रय रेषेखालील , अनुसूचित जाती तसेच जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत पीडित व्यक्तींना घेता येणार आहे.

या योजनेचे उद्धिष्ट ?
अनुसूचित जातीच्या भूमिहीन, दारिद्र्य रेषेखालील , विधवा महिला यांचे जीवनमान सुधारावेत यासाठी ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना ४ एकर कोरडवाहू शेतजमीन किंवा २ एकर बागायत शेतजमीन उपलब्ध करून देण्यात येते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *