युरिया ऐवजी याची फवारणी करून मिळवा अधिक उत्पन्न
पिकांची चांगली वाढ व्हावी, मातीचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पोषक घटकांची आवश्यकता असते. पिकांच्या वधिस्तही सर्वात महत्वाचा घटक नायट्रोजन असतो. नायट्रोजन शिवाय पिकांची वाढ होणे जवळजवळ अशक्य आहे. पीक कोणतेही असो त्याच्या उत्तम वाढीसाठी नायट्रोजनची गरज पडतेच. युरियामध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते. यामुळे शेतकरी पिकांची उत्तम वाढ व्हावी म्हणून युरियाचा वापर करत असतो. युरियामध्ये जवळपास ४६ % पर्यंत नायट्रोजन उपलब्ध असते, असे कृषी वैज्ञानिकांनी सांगितले आहे. मात्र अनेकवेळा युरियाची टंचाई असते अश्यावेळेस पिकांची घट होते तर पिकांवर याचा विपरीत असा परिणाम होतो. तेव्हा शेतकऱ्यांना आता काय करावे असा प्रश्न पडतो. यावर उपाय म्हणून उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी एक कमालीचा उपाय शोधून काढला आहे. येथील शेतकरी युरिया ऐवजी गोमुत्राचा वापर करतांना दिसून येत आहे.
दर्जेदार उत्पादनासाठी करा गोमुत्राचा उपयोग
अनेकदा युरियाची टंचाई निर्माण होत असते. याचा परिणाम पिकांवर होऊ नये यासाठी उत्तर प्रदेशात एक अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. येथील शेतकऱ्यांनी नायट्रोजन युक्त युरिया ऐवजी गोमुत्राचा अवलंब केला आहे. उत्तर प्रदेशातील गहू उत्पादक शेतकऱ्यांनी पिकांवर गोमुत्राची फवारणी केली आहे. गोमूत्र नायट्रोजनची कमतरता पूर्ण करतो. त्यामुळे इतर खतांपेक्षा जैविक खतांचा वापर करणे शेतकऱ्यांनी पसंद केले आहे.
हे ही वाचा ( Read This ) पिकांसाठी फायदेशीर असणारी जिवाणू स्लरी.
जैविक पद्धतीने शेती करणे ठरते फायदेशीर
शेती टिकविण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर केल्यास रासायनिक खतांवर व औषधांवर होताना खर्च वाचू शकतो कारण जैविक शेतीमध्ये खते व औषध नैसर्गिक साधनांचा वापर करून तयार करतात. त्यामुळे त्यावर खर्च अल्पशा प्रमाणात होतो. जैविक शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण – गोमुत्राचा जास्त वापर करणे यामुळे वाफ्यात पाणी टिकून राहते. बैलांच्या मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते. जैविक पद्धतीचा अवलंब केल्यास पिकांची उत्तम वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होते.