इतर बातम्या

किसान कार्डसाठी शेवटची तारीख १५ फेब्रुवारी

Shares

शेतकरी (Farmer) शेतीबरोबर अधिक उत्पन्न मिळ्वण्यासाठी पशुपालन करत असतो. यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकार अनेक विविध योजना, (Scheme) कार्यक्रम राबवत असते. शेतकरी अधिक उत्पन्नासाठी दुग्ध (Dairy ) व्यवसायाची निवड करत असतो. पशुपालकांना आर्थिक मदत व्हावी त्यांना संबंधित योजनेचा लाभ घेता यावा यासाठी राष्ट्रीय मोहिमेत किसान क्रेडिट कार्ड चे (Kisan Credit Card ) वाटप केले जात आहे. या क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ घेता येईल. या मोहिमेला १५ नोव्हेंबर पासून सुरुवात केली होती १७ डिसेंबर पर्यंत ५० हजार ४५४ किसान क्रेडिट कार्डचे (KCC) वाटप झाले आहे. यासाठी अर्ज करणे गरजेचे असून अजून दीड महिना अर्ज करता येणार आहे. शेतकऱ्यांना जिल्हा शिबिरामध्ये सहभागी होऊन या कार्डचा लाभ घेता येणार आहे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत आहेत तरीही त्यांच्या उत्पन्नात वाढ होत नसल्यामुळे सरकार विविध योजना , कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.

हे ही वाचा (Read This Also ) युवा शेतकऱ्यांना मिळणार शासनाकडून या व्यवसायासाठी 50% अनुदान

पशुपालनाला मिळत आहे जास्त महत्व
दुग्ध व्यवसायाचे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेंमध्ये महत्वाचे योगदान आहे. देशातील अनेक कुटुंबांची उपजीविका दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. दूध उत्पादन क्षेत्रामध्ये भारत अग्रेसर असून यंदा या वर्षी ८०० कोटीं रुपयांपेक्षा जास्त दूध विक्री झाली आहे.

किसान क्रेडिट कार्ड
पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड मिळावे तसेच त्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी जिल्ह्यात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आठवड्यातून एकदा या कार्डची वाटप होणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून याचे वाटप करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एका गाई मागे ४० हजार ७०० रुपये तर म्हशीमागे ६० हजार २४९ रुपये कर्ज दिले जात आहे. गाय , म्हैस , मेंढी, शेळी, कुक्कुटपालन यासाठी ४% व्याजासह ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *