नवीन वर्षात शेतकऱ्यांना मिळणार गिफ्ट,खात्यात जमा होणार रुपये
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकार देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १० वा हफ्ता देणार आहे. १ जानेवारीला १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २० हजार कोटी रुपये जमा होणार आहे. आता पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर १. ६ लाख कोटी जमा करण्यात आले आहे. पीएम किसान योजनेबाबत एक निवेदन पत्र जारी करण्यात आले असून १ जानेवारी २०२२ ला दुपारी १२.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेचा १० वा हफ्ता हस्तांतरित करणार आहे.
पीएम किसान योजना काय आहे ?
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (pm kisan ) केंद्र सरकारने डिसेंबर २०२८ ला सुरु केली होती. या योजनेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करत असते. या योजनेअंतर्गत २ हेक्टरी पेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना २ हजार रुपयांचे वर्षाला ३ हफ्ते दिले जातात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात.
एकाच अर्जावर मिळणार शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ ?
पीएम किसान योजनेत आपले नाव कसे पाहावे ?
१. पीएम किसान योजनेत आपले नाव पाहण्यासाठी PM Kisan च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागते.
२. संकेतस्थळाच्या होम पेज वर उजव्या बाजूला farmers corner असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावेत.
३. त्यांनतर तिथे एक पर्याय दिसेल Beneficiaries List. त्यावर क्लिक करावेत .
४. नंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक ची निवड करावीत.
५. त्यानंतर तुमच्या समोर लाभार्थ्यांची यादी समोर येईल. तुम्ही त्या यादी मध्ये आपले नाव शोधू शकतो.
पीएम किसान योजना अधिकृत संकेत स्थळ