केंद्राच्या या निर्णयामुळे सोयाबीनच्या दरात वाढ ?
मागील काही महिन्यांपासून शेतकरी सोयाबीन संबंधित शासन निर्णयाची प्रतीक्षा करत होता. आता ही प्रतीक्षा संपली आहे. सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत होती त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक करून ठेवली होती. शेतकऱ्यांच्या या निर्णयाचा तसेच आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील सोयाबीन मागणीचा सोयाबीन दरावर चांगला परिणाम झाला आहे. सोयाबीनच्या दरात सततच्या घसरणीनंतर ६ हजार २०० रुपयांवर स्थिर झाले होते. आता त्याच्या दरात वाढ होतांना दिसून येत आहे. आता सोयाबीनचे दर ६ हजार ६०० रुपयांवर येऊन पोचले आहे. याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने घेतलेले ३ निर्णय होय. नेमके काय आहेत हे ३ निर्णय याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
काय आहेत सरकारचे निर्णय ?
केंद्र सरकारने दिलासा देण्याच्या हेतूने तेलबिया, खाद्यतेल यांच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी वायदे बंदी केली होती. तसेच आयातीच्या कालावधीत वाढ केली होती. मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही. गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीन दरात वाढ तर कधी घट होत होती. मात्र आता सरकारच्या निर्णयामुळे सोयाबीन दरात वाढ होतांना दिसत आहे.
शेतकऱ्यांच्या निर्णयाचा देखील झाला सोयाबीन वाढीवर परिणाम ?
सोयाबीनच्या दरात वाढ किंवा घट काहीही झाले तरी आम्ही टप्याटप्याने आवक करणार असा शेतकऱ्यांनी निर्णय घेतला होता आणि त्यावर ते ठाम होते. शेतकऱ्यांनी सुरवातीपासूनच हा निर्णय घेतला होता. गेल्या आठवड्यात २ लाख ५० हजार पोत्यांची विक्री झाली होती. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे सावकाशपणे सोयाबीन दरात वाढ होत आहे.
सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याचे मुख्य कारण काय ?
मागील आठ्वड्यात सोयाबीनची आवक कमी होऊन देखील त्याच्या दरात सुधारणा होत नसून एका कालावधीनंतर दर स्थिर झाले होते. हे दर ६ हजार १०० वर येऊन थांबले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक केली होती. मात्र एवढी साठवणूक करून सोयाबीनचे काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. मात्र आता दरात सुधारणा होतांना दिसून येत आहे. सोयाबीनच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे. आता हे दर टिकून राहतील असा अंदाज दर्शविला जात आहे. सोयाबीनची विक्री कमी केल्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ झाली असे म्हणण्यास हरकत नाही.
हे ही वाचा.