शेतकऱ्यांनो या स्पर्धेत भाग घ्या अन् हजारोंची बक्षीसे मिळवा, अर्ज करा ३१ डिसेंबर पूर्वी
उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शासकीय स्तरावर विविध प्रयत्न केले जाते. राज्य तसेच केंद्र सरकार उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी अनेक योजना, उपक्रम राबवत असते. आता मात्र रब्बी हंगामात पीक स्पर्धेची चर्चा सगळीकडे सुरु आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात . रब्बी हंगामात ज्या शेतकऱ्यांनी अधिकचे पीक घेतले आहे त्यांना प्रशासन बक्षीस देणार आहे.या स्पर्धेची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. या मागचा मुख्य उद्देश असा आहे की उत्पादनात वाढ व्हावी. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे. या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी अर्ज दाखल करावा.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नेमक्या कोणत्या अटी आहेत?
१. या स्पर्धेत सहभागी होण्यास्तही सर्वात पहिली अट अशी आहे की किमान १० आर जमीनक्षेत्रावर पीक घेणे गरजेचे आहे.
२. ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ आदी पिकांचा समावेश राहणार आहे.
३. तुम्हाला जर या स्पर्धेतून माघार घ्यायची असेल तर पीक कापणीच्या १५ दिवसाअगोदर सर्व संबंधित अधिकाऱ्यांना लेखी सांगावे लागेल.
४. या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर ३०० रुपये प्रवेश फी असणार आहे.
५. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ ही आहे.
बक्षिसाचे स्वरूप कसे असेल ?
ही स्पर्धा राज्य, जिल्हा, तालुका, विभाग स्तरावर होणार आहे. पीकनिहाय प्रथम,द्वितीय,तृतीय असे बक्षिसाचे स्वरूप असणार आहे.
१. तालुका पातळीवर पहिले ५ हजार , दुसरे ३ हजार आणि तिसरे २ हजार रुपये बक्षीस असणार आहे.
२. जिल्हा स्तरावर पहिले १० हजार , दुसरे ७ हजार आणि तिसरे ५ हजार रुपये बक्षीस असणार आहे.
३. विभागीय स्तरावर पहिले २५ हजार, दुसरे २० हजार तर तिसरे १५ हजार रुपये बक्षीस असणार आहे.
४. विभागीय स्तरावर पहिले ५० हजार, दुसरे ४० हजार आणि तिसरे ३० हजार रुपये बक्षीस असणार आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी कुठे करता येईल ?
कृषी कार्यालयाकडून एक अर्ज दिला जाईल तो अर्ज भरून त्यास खाली दिलेले कागदपत्रे जोडून तालुका कृषी कार्यालयात सादर करावा लागणार आहे. तसेच त्यासाठी ३०० रुपये प्रवेश फी आहे.
कागदपत्रे –
१. ७/१२
२. ८ अ चा उतारा
३. जात प्रमाणपत्र.
एका तालुक्यातून किमान १५ शेतकऱ्यांचे अर्ज असणे आवश्यक आहे. अन्यथा प्रवेश फी परत करून स्पर्धा रद्द करण्यात येईल.
हे ही वाचा.