शेतकऱ्यांना लाल मिरचीचा गोडवा , नंदुरबार मुख्य बाजारपेठेत विक्रमी दर
भारतामध्ये नंदुरबार मिरचीचे मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. यावेळेस नंदुरबार मध्ये मिरचीला विक्रमी भाव मिळाला आहे. येथील बाजारपेठेत मोठ्या संख्येने आवक असतांना देखील दर मात्र टिकून आहेत. तब्बल गेल्या ५ वर्षात सर्वाधिक दर या वर्षी मिळाला आहे. तसेच भविष्यात मिरचीची मागणी वाढली तर अधिक दर वाढ होण्याची शक्यता आहे.बदलते वातावरण , अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे जवळजवळ सर्वच पिकांचे खूप नुकसान झाले आहे. अश्या वेळेस शेतकरी हतबल झाला होता मात्र लाल मिरचीने शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा. या मिरचीच्या भावात भविष्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यापासून मिरचीची आवक सुरु झाली आहे. पुरवठा व मागणी दोन्ही हि सरासरीने आहे. लाल मिरचीला सध्या ४ हजार प्रति क्विंटल असा दर आहे.
लाल मिरचीच्या दराबरोबर आवक देखील विक्रमी
लाल मिरचीच्या चांगल्या उत्पादनाबरोबर मागणी देखील जास्त प्रमाणात होत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक झाला तर दरात घसरण होते हे बाजारपेठेचे सूत्र आहे. परंतु लाल मिरचीच्या बाबतीत मात्र सर्व उलटे झाले आहे. लाल मिरचीची आवक आणि दर दोन्ही विक्रमी आहे. डिसेंबर महिन्यातच आतापर्यंत १ लाख टन लाल मिरचीची आवक झाली. तर दर ४ हजार क्विंटल पर्यंत मिळत आहे. अनेक दिवसानंतर कोणत्या अंतरी पिकास चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये थोडे आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
मिरचीच्या वाढलेल्या दरामुळे चटणीवर झाला परिणाम
मध्यंतरी वातावरणामुळे मिरचीची आवक कमी झाली होती त्यामुळे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. परंतु आता मात्र चित्र बदलले आहे. मिरचीचे दर वाढल्यामुळे आता चटणीच्या दरात देखील वाढ झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात थोडी घट झाली मात्र दरात थोडी देखील घट झालेली नाही.