सोयापेंडची भारतातून विक्रमी निर्यात !
गेल्या काही दिवसांपासून सोया पेंड वर चर्चा सुरु होती एवढेच काय सोयपेंड वरून राजकारण गाजले होते. त्यात सोयाबीनच्या दरात कधी स्थिरता तर कधी चड- उतार होत होती. या काही दिवसाच्या अनुभवानंतर हे लक्षात आले की, सोयाबीन पेंडची आयात केल्यास सोयाबीनचा बाजारभाव घसरतो तर सोयपेंडची निर्यात केल्यास सोयाबीनच्या भावात निश्तितपणे वाढ होते. शेतकऱ्यांनी या वेळेस सोयाबीन साठवणुकीवर जास्त भर दिला होता. त्यामुळे सोयाबीनच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली होती. परंतु नंतर भाव हे स्थिर झाले होते.
गेल्या वर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर च्या महिन्यात सोयाबीनची आवक एकूण ३७ लाख टन इतकी होती. परंतु या वर्षी सोयाबीन आवक फक्त २९ लाख टन झाली आहे. बाजारपेठेत सोयाबीनची कमी झालेली आवक यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे.असे बाजारातील अभ्यासकांनी सांगितले आहे. या वर्षी नोव्हेंबर २०२१ च्या अखेरीस सोया पेंड निर्यात ५८ हजार टनांनी वाढून २ लाख ७० हजार टन पर्यंत पोहोचली आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अंदाजे १८ लाख टन सोयाबीनची आवक झाली होती. त्यामुळे यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची आवक वाढेल असे दिसून येत होते. परंतु २०२१ मध्ये देखील फक्त १४ लाख टन सोयाबीनची आवक झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यावेळेस शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची साठवणूक केली आहे.
या वर्षी आयात ४ लाख टन तर मागील वर्षाचा शिल्लक साठा २.४१ लाख टन गृहीत धरून सोयाबीनचा एकूण पुरवठा ७४.२४ लाख टन पर्यंत होईल. यांपैकी पशु खाद्यासाठी ५८ लाख टन सोया पेंड वापरनी जाईल. देशात ९० लाख टन सोयाबीन गाळप होऊन त्यापासून ७१.८३ लाख टन सोयाबीन निर्मिती होईल असे सांगितले जात आहे.