इतर

पीक विमा भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर !

Shares

शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. तर अनेक योजना ह्या अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना साहाय्य करत असतात. अशीच एक महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर हा विमा मिळवून त्यांना मदत होऊ शकते. परंतु यासाठी विमा काढणे गरजेचे आहे. हा विमा भरण्याची अंतिम तारीख ही ३१ डिसेंबर २०२१ आहे. ३१ डिसेंबर पूर्वी जर शेतकऱ्यांनी विमा भरला नाही तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यांना कुठलीही भरपाई मिळणार नाही. त्यामुळे अंतिम तारखेपूर्वी शेतकऱ्यांनी विमा काढून त्याचा लाभ घ्यावा. आपण प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

विम्याचा हफ्ता हा किती असेल ?
गहू, मसूर, मोहरी, बार्ली या प्रमुख रब्बी पिकांसाठी दीड टक्के तसेच बटाट्यासाठी पाच टक्के प्रीमियर दर ठरवण्यात आला आहे.

लाभ कसा घेता येईल ?
अनुदान, योजना या नैसर्गिक आपत्ती तसेच इतर प्रकारच्या संकटात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असते. झालेल्या पिकाचे नुकसान भरून निघावेत यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारत सरकारच्या पोर्टल वर जाणून नोंदणी करणे गरजेचे आहे.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी काय काम करावेत ?
शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असल्यास कृषी विभाग, संस्था , संबंधित बँक शाखा यास ७२ तासांच्या आत सर्व परिस्थितीचा तपशील द्यावा लागतो. विमा केवळ दीड टक्के प्रीमियर वर असेल. उरलेली रकम ही केंद्र , राज्य सरकार मिळून भरतात .

कुठे संपर्क साधू शकतो ?
मदतीसाठी १८००-८८९-६८६८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.

या पीक विमाचा लाभ घेण्यासाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत काढणे गरजेचे आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *