शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : महावितरणने केले 15 हजार कोटी माफ !

Shares

सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत वेगवेगळ्या योजना राबवत असते. दिवसेंदिवस कृषीपंप धारकाकडे थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. यासाठी सरकारने एक योजना राबवली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना लाभ होणार असून महावितरणच्या वसुलीमध्ये वाढ होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे होणार आहे.
राज्यात कृषीपंप धारकाकडील थकबाकी वाढतच चालली आहे. यासाठी एक अनोखी आगळीवेगळी योजना राबवली जात आहे. सरकार कृषिपंपाची थकबाकी तसेच त्यावरील व्याज यात सवलत देणार असून १५ हजार ९६ कोटी ६६ लाख रुपये माफ करण्यात आलेले आहे. तर आता शेतकऱ्यांना चालू बिल आणि मार्च २०२२ पर्यंत सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकम भरावी लागणार आहे. यामुळे जवळ जवळ ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना अधिक म्हणजेच १५ हजार ३५३ कोटी ८८ लाख रुपये अजून माफी मिळणार आहे.
नेहमी कृषिपंपाच्या थकबाकीकडे दुर्लक्ष होत गेले आहे. मात्र आता वेगवेगळ्या योजना राबवून वसुली करावी लागणार आहे, असे सरकारच्या निदर्शनास येताच त्यांनी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर वीजबिलाच्या दुरुस्तीमध्ये २६६ कोटी ६७ लाख कमी झाले आहे. त्यामुळे ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांकडे आता ३० हजार ४४१ कोटी रुपये थकबाकी राहिलेली आहे.

या योजनेचा शेतकऱ्यांना काय होईल फायदा ?
बाकी राहिलेल्या थकबाकीपैकी ५० % रक्कम मार्च २०२२ पर्यंत भरल्यास त्यामध्ये ५० % सवलत मिळणार आहे. राज्यातील ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लबाग घेतला तर १५ हजार ३५३ कोटी ८८ लाख रुपये माफ होणार आहेत. त्यामुळे या सवलतीचा जास्तीतजास्त लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे.

थकबाकी न दिल्यास काय होईल कारवाई ?
शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतल्यास त्यांना ५० टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे. परंतु थकबाकी अदा न केल्यास कृषिपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

आता पर्यंत पुणे विभागातील शेतकऱ्यांनी कसा घेतला सर्वाधिक लाभ ?
महावितरणेच्या योजनेला सुरुवात झाल्यापासून पुणे विभागातील शेतकऱ्यांनी सर्वात जास्त लाभ घेतला आहे. या योजनेत सहभाग घेऊन ५ लाख ९० हजार ७०५ शेतकरी थकबाकी मुक्त झाले असून १ लाख ८४ हजार शेतकऱ्यांची वीज बिले कोरी झाली आहेत.

या योजनेचा लाभ शेतकऱ्यांसोबतच महावितरण कंपनीला देखील होणार आहे. त्यामुळे सरकारच्या या अनोख्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त घेतला पाहिजे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *