इतर बातम्या

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ,पीक विमा वाटपाला सुरुवात.

Shares

शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप हंगामातील पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली असून मराठवाड्यातील कित्तेक शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचा संदेश आला आहे. पिकाची स्थिती लक्षात घेऊन पैसे जमा झाले आहेत. ज्यांनी विमा रकम अगोदर अदा केली आहे अशांच्या खात्यावर पहिल्यांदाच रकम जमा झाली आहे. खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा अधिकतर विमा भरला होता. खात्यात रकम जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे अजूनही जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना चिंता होत आहे.
पीक विमा रकम दिवाळीमध्ये जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. परंतु पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे दिरंगाई झाली आहे. दीड महिन्यांपासून हे पैसे प्रक्रियेमध्ये अडकले होते मात्र आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पैसे टप्याटप्याने जमा होत आहेत. तरीही शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास त्यांनी पीक विमा कंपनी , बँक यांच्याकडे तक्रार न करता तहसिलदाराकडे तक्रार करावी लागणार आहे. शेतकरी ही तक्रार प्रत्यक्षाबरोबर ऑनलाईन देखील करू शकतो. ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातील अगोदरच विमा रकम भरली होती त्यांना जास्त प्राधान्य दिले जात आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *