इतर बातम्या

शेतकऱ्यांवर पुन्हा नवीन आर्थिक संकट !

Shares

गेल्या काही महिन्यांपासून एकामागोपाठ शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहत आहे. आता केंद्र सरकाने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व्यवस्थेचा प्रश्न पडला आहे. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत असतो. मात्र आता रासायनिक खताच्या दरात वाढ झाली असून त्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन रब्बी हंगामात खतांच्या किमतीत १०० ते २०० रुपयांनी वाढ त्याच बरोबर आवश्यक असणाऱ्या खतांचा तुटवडा भासत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून रब्बी पिकांची वाढ चांगली , जोमात व्हावी यासाठी शेतकरी पिकांवर १०-१२-२६ या खताची फवारणी करत असतो.त्यामुळे या खताचा सर्वाधिक तुटवडा होत आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पासून पडल्यामुळे खताच्या मागणीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारने खतांच्या आयातीमध्ये २० टक्क्याने कपात केल्याचा परिणाम बाजारपेठेवर झाल्याचा दिसून येत आहे. खतांना मागणी जास्त व पुरवठा कमी असल्यामुळे आता मनमानी किंमत होत आहे. १०-२६-२६, १५-१५-१५, १८-१८-१० या रासायनिक खताच्या प्रत्येक पाकीटा मागे १०० ते २०० रुपयांनी वाढ झाली आहे. एवढेच काय तर सर्व पर्यायी खतांमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यामुळे महागडे खत विकत घेण्याशिवाय शेतकऱ्यांकडे काहीही पर्याय उरलेला नाही.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *