कांदा उत्पादकासाठी काय आहेत महत्वाच्या टिप्स ?
कांदा उत्पादक यादीमध्ये महाराष्ट्राचे नाव सर्वात वरती आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. बदलत्या वातावरणाचा कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. अश्या वेळेस कांदा पिकाची विशेष काळजी घेणे महत्वाचे असते. सध्या अतिवृष्टीमुळे लाल कांदा पिकाचे बरेच नुकसान झाले आहे. कांद्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. कांद्या पिकाची नेमकी काळजी कशी घ्यावी याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
कांदा पिकाची काळजी कशी घ्यावी ?
१. पाऊस थांबल्याबरोबर पिकांवर फवारणी करू नये. पावसाचा अंदाज घेऊनच फवारणी करावी . जेणेकरून पावसामुळे फवारणी वाया जाणार नाही.
२. शेतात पाणी साचले असेल तर फवारणी करू नये. अश्या वेळेस फवारणी केल्यास फवारणीचा पिकांवर कोणताही प्रकारचा परिणाम होत नाही.
३. कांदा नगदी पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
४. कांदा पीक अल्पकालावधील देखील काढता येते.
५. कांदा पिकावर बुरशीजन्य रोग दिसताच त्वरित बुरशीनाशक औषधांची फवारणी करावीत.
६. कांदा लागवडीस २ महिने झाल्यास त्यावर अडेक्सर बुरशीनाशक उत्तम काम करते.
७. कांदा पिकासाठी बीएसएफ ऑपेरा बुरशीनाशक प्रभावीपणे कार्य करते.
कांद्यास बाजारात बाराही महिने मोठ्या संख्येने मागणी असते. कांदा पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादन जास्त मिळते.