पशुधनयोजना शेतकऱ्यांसाठी

शेतकऱ्यांसाठी मोफत पशु वाटप योजना , शेवटची दिनांक १८ डिसेंबर २०२१ !

Shares

शेतकरी जोडधंदा म्हणून पशुपालन करत असतो. राज्य शासनाने शेतकऱ्यांसह सुशिक्षित , बेरोजगार युवकांसाठी पशु वाटप योजना सुरु केली आहे. जेणेकरून त्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध होईल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय अश्या २ योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

पशु वाटप योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे-
१. फोटो ओळखपत्र सत्यप्रत
२. सातबारा
३. ८ अ उतारा
४. अपत्य दाखल / स्वघोषणा पत्र
५. आधारकार्ड
६. अनुसूचित जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
७. ७-१२ मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा
८. रहिवासी प्रमाणपत्र
९. दारिद्र्य रेषेखाली असलेले प्रमाणपत्र
१०. रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र ( एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल )
११. बँक खाते पशब्बोक सत्यप्रत
१२. शैक्षणिक पात्रतेचा दाखला
१३. दिव्यांग असल्याचा दाखला
१४. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याची साक्षांकित प्रत
१५. वय, जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१६. रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

प्राधान्य कोणाला देण्यात येईल?
१. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२. महिला बचत गट ( अ. क्र. २ ते ३ मधील )
३. अल्प भूधारक ( १ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक )
४. सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले

या योजनेसाठी अर्ज कुठे करता येईल?
https://ah.mahabms.com/ या संकेत स्थळावर जाऊन अर्ज करता येईल.

टीप – अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२१ ही आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *