आर्थिक संकटात देखील महावितरणने शेतकऱ्यांना दिली सवलत !

Shares

महावितरण ग्राहकांना ना तोटा ना नफा या तत्वावर सेवा पुरवत आली आहे. वीजखरेदी, पारेषण खर्च असे विविध खर्च तसेच त्यांचे कोट्यवधी रुपयांचे हफ्ते देणे बाकी आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
नियमितपणे वीज देयक भरणे हे ग्राहकाचे कर्तव्य आहे. ग्राहकाने जर विजेचा वापर केला नसेल तर महावितरण कंपनी स्थिर शुल्क आकारत असते. सध्या महावितरणच्या वीज ग्राहकाकडे अंदाजे ७१ हजार ५७८ कोटी रुपयांपर्यंत थकबाकी आहे. अश्या आर्थिक संकटामुळे महावितरणाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राहकांकडे मोठ्या संख्येने थकबाकी देणी असल्यामुळे महावितरणाकडे वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही असे, महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याचबरोबर कृषी पंपाच्या वीज बिलामधील थकबाकी रकमेत ६६% सवलत देण्यात आली आहे याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा तसेच या आर्थिक संकटातून निघण्यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *