असे करा नारळावरील इरिओफाईड कोळीचे व्यवस्थापन
नारळाचा उपयोग आपण विविध पदार्थ बनवन्यासाठी करतोच तर त्याच बरोबर त्याचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत. भारतात अनेक शेतकरी नारळ बागेची लागवड करतात. नारळ बागेत सर्वात जास्त आढळून येणारी किडी म्हणजे इरिओफाईड कोळी. या किडीचा दुष्परिणाम फळाच्या वाढीवर मोठ्या प्रमाणात होतो. आपण आज इरिओफाईड कोळी किडीचे लक्षणे व त्यावरील उपाययोजना जाणून घेऊयात.
इरिओफाईड कोळीचे लक्षणे –
१. इरिओफाईड कोळीचा प्रादुर्भाव झाल्यास नारळाच्या देठाखालील भागात पिवळे , पांढरे चट्टे दिसून येतात. कालांतराने त्या त्यांची वाढ होत जाते.
२. नारळ फळाची वाढ खुंटते.
३. नारळ फळावरील आवरण तडकते.
४. नारळ लहान असतांनाच त्यांची गळ होण्यास सुरुवात होते.
उपाययोजना –
१. इरिओफाईड कोळी किडीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के कडुलिंब कीटकनाशक ७ मिली पाण्यात मिसळून मुळांद्वारे द्यावे.
२. पिकास औषध दिल्यानंतर ४५ दिवसापर्यंत नारळाची काढणी करू नये.
३. फवारणी करण्यापूर्वी तयार झालेले नारळ काढून घ्यावेत.
४. या किडीच्या प्रादुर्भावामुळे खाली गळून पडलेले फुले , फळे गोळा करून नष्ट करून टाकावेत.
अश्या प्रकारे कडुलिंबाचा वापर करून इरिओफाईड कोळीवर नियंत्रण आणता येते.