खतांची गुणवत्ता कशी ओळखावी

Shares

जमिनीची सुपीकता वाढावी , पिकांची वाढ चांगली व्हावी , निरोगी पीक यावे यासाठी खते अत्यंत महत्वाचे असतात. वेळोवेळी मातीचे परीक्षण करणे देखील महत्वाचे आहे. कोणते खत , जमीन कोणत्या पिकासाठी महत्वाचे आहे हे माहिती असणे गरजेचे आहे. खतांची गुणवत्ता तपासून घेणे आवश्यक असते. जेणेकरून कोणत्या खताचा वापर किती प्रमाणात केला पाहिजे हे लक्षात येते. आज आपण खतांच्या गुणवत्तेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

खतांची गुणवत्ता अशी तपासावी –
डीएपी –
१. डीएपी चे दाणे कठोर , काळे , भुरे , बदामी रंगाचे असतात.
२. या खताची गुणवत्ता ओळखण्यासाठी याचे काही दाणे हातात घ्यावे त्यावर थोडा चुना रगडावा त्यातून तीव्र असा गंध तयार होतो.
३. त्याचा वास घेणे अत्यंत कठीण जाते.
४. याचे काही दाणे फरशीवर रगडले तरी ते तुटत नाहीत.
५. याचे दाणे थोडे मंद आचेवर तव्यावर गरम केल्यास ते फुगतात.

युरिया –
१. युरिया चमकदार पांढऱ्या रंगाचा असतो.
२. याचे दाणे एकसमान आकाराचे असतात.
३. पाण्यामध्ये युरियाचे दाणे टाकले असता ते पूर्णपणे विरघळतात.
४. या द्रावणास स्पर्श केल्यास ते द्रावण थंड लागते.
५. युरियाचे दाणे उन्हात ठेवले असता ते वितळतात.
६. जास्त तीव्र ऊन असेल तर युरियाचे काही ही अवशेष राहत नाही.

एसएसपी –
१. एसएसपी चे दाणे दाणेदार, कठोर, काळे, भुरे रंगाचे असते.
२. एसएसपीखत पावडर स्वरूपात देखील उपलब्ध असते.
३. या खताचा मिश्र खतांसारखाच वापर केला जातो.

एमओपी –
१. एमओपी मिठासारखे पांढऱ्या रंगाचे , लाल मिरचीच्या मिश्रणासारखे असते.
२. एमओपीचे दाणे ओलसर केले असता एकमेकांना चिटकत नाही.
३. हे खत पाण्यात मिसळले तर त्याचा लाल भाग पाण्यात वरती तरंगतो.

झिंक सल्फेट –
१. या खतामध्ये मॅग्नेशियम सल्फेट चे प्रमुख मिश्रण असते.
२. या खताच्या भौतिक रूप समानतेमुळे नकली व असली यांची पडताळणी करणे अवघड असते.
३. याची गुणवत्ता तपासण्यासाठी यामध्ये डीएपी चे मिश्रण टाकावे लागते. त्यानंतर हे दाट द्रावण तयार होते. मॅग्नेशियम सल्फेट सोबत असे होत नाही.
४. या खतामध्ये पातळ दाहक सोडा मिसळला असता पांढरे , तपकिरी रंगाचे द्रावण तयार होते.

अश्याप्रकारे तुम्ही खतांची गुणवत्ता पडताळू शकता. पडताळणी करूनचखताची निवड करावीत.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *