मालामाल करणारे अंजीर लागवड
सध्या शेतकरी नगदी पिकाकडे जास्त वळत आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना नवीन संधी उपलब्ध होत आहे. त्यातून उत्पन्न देखील चांगले मिळत आहे. अंजीर हे एक औषधी वनस्पती असून या पिकाची लागवड मोठ्या संख्येने केली जात आहे. अंजीर पिकापासून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवता येते. आज आपण अंजीर पिकाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
जमीन व हवामान –
१. हलक्या माळरान ते मध्यम तांबड्या , काळ्या जमिनीत अंजीर पिकाची लागवड करता येते.
२. जास्त प्रमाणात चुनखडी असणाऱ्या तांबड्या , काळ्या जमिनीत अंजिराची वाढ उत्तम होते.
३. उत्तम पाण्याचा निचरा करणाऱ्या जमिनीत हे पीक चांगले येते.
४. अंजीर पिकास उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते.
५. ओलसर , दमट हवामान या पिकास घातक ठरते.
६. कमी पावसाच्या प्रदेशात हे पीक घेता येते.
सुधारित जाती –
१. सिमरना
२. काबुल
३. कालीमिरीना
४. कडोटा
५. मारसेल्स महाराष्ट्रात मुख्यतः ह्या जातींची लागवड केली जाते.
लागवड –
१. अंजीर लागवड करतांना खड्डा खोदून त्यात संतुलित खत व खाद्य घालावेत. त्यानंतर त्यात रोपे लावावीत.
२. अंजीर रोपे लागवड ८ x ८ मीटर अंतरावर करणे योग्य ठरते.
३. अंजीर पिकाची लागवड डिसेंबर- जानेवारी किंवा जुलै – ऑगस्ट महिन्यापर्यंत करावीत.
काढणी –
१. उष्णकटिबंधीय प्रदेशामधील वसंत ऋतू मध्ये येणारी फळे मे- ऑगस्ट महिन्यांच्या दरम्यान तयार होतात.
२. फळे पूर्णपणे पिकल्यानंतर त्यांची काढणी करावी.
३. जास्त संख्येने फळांची काढणी करायची असेल तर पाण्याने भरलेल्या भांड्यात ही फळे गोळा करावीत.
उत्पादन –
अंजीर फळाचे प्रति एकरी १५ ते १८ टन पर्यंत उत्पादन मिळते.
अंजीर पिकास बाजारात उत्तम बाजारभाव मिळतो. अंजीरमध्ये औषधी गुणधर्म दडलेले असल्यामुळे या पिकास बाराही महिने मागणी असते.