पिकांसाठी फायदेशीर असणारी जिवाणू स्लरी
शेतकरी उत्तम पीक यावे यासाठी विविध रासायनिक , सेंद्रिय खतांचा वापर करत असतो. अश्याच एका स्लरी जिवाणू बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. स्लरीचा वापर केल्यास पिकास अन्नद्रवे उपलब्ध होण्यास मदत होते. जिवाणू स्लरीचे फायदे तसेच बनवायची पद्दत जाणून घेऊयात.
जिवाणू स्लरीचे फायदे –
१. जिवाणू स्लरीमुळे हवेतील अन्न शोषले जातात. जे पिकांना फायद्याचे ठरते.
२. स्लरी मुळे सेंद्रिय पदार्थांची जलद विघटन क्षमता वाढते.
३. बियाणांच्या उगवण क्षमतेत वाढ होते.
४. जमिनीचा पोट सुधारण्यास मदत होते.
५. रासायनिक खतांवरील खर्चात घट होते.
६. पिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढते.
७. पिकांची जोमाने वाढ होते.
८. जिवाणू स्लरी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही.
९. जिवाणू स्लरी द्रव्य स्वरूपातील स्फुरद विरघळून पिकास उपलब्ध करून दिले जाते.
जिवाणू स्लरी तयार करण्याची पद्धत –
१. जिवाणू स्लरी बनवण्यासाठी ताजे शेण २० किलो , गावरान गाईचे १० लिटर गोमूत्र , काळा गूळ २ किलो , पोटॅश मोबिलिझर ५०० ग्रॅम , अझोटोब्रँक्टर ५०० ग्रॅम , जैविक बुरशीनाशक १ किलो , पाणी २०० ते २५० लिटर एका सिमेंटच्या टाकीत टाकून ते चांगल्याप्रकारे मिसळावेत.
२. तयार केलेले द्रावण ५ ते ६ दिवस ठेवावेत.
३. दररोज सकाळी हे द्रावण व्यवस्थित मिसळावेत.
अश्या नैसर्गिक जिवाणू स्लरी चा उपयोग केल्यास पिकांची वाढ जोमाने होऊन जास्त उत्पादन मिळते.