पिकपाणी

लखपती बनवणारी कोरफड लागवड

Shares

आयुर्वेदात महत्वाची मानली जाणारी कोरफड अनेक दुर्मिळ रोगावर उपयुक्त ठरते. कोरफड पिकाची मुख्य पीक म्हणून शेती करता येते तर अनेक शेतकरी आंतरपीक म्हणून कोरफड पीक घेतात. कोरफडीचे दैनंदिन जीवनात देखील अनेक उपयोग आहेत. कोरफडची मागणी बाजारात मोठ्या संख्येने असते. त्यापासून अनेक औषधी तयार केल्या जातात. आपण आज कोरफड लागवडीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जमीन व हवामान –
१. कोरफड पिकासाठी हलकी ते मध्यम जमीन असणे गरजेचे आहे.
२. पाण्याची उप्लब्धता कमी असली तरी हे पीक घेता येऊ शकते.
३. पाण्याचा उत्तम निचरा करणारी जमीन निवडावीत.
४. सर्व हंगामात कोरफड लागवड करता येते.
५. उन्हाळाच काळ कोरफड लागवडीसाठी उत्तम असतो.

लागवड –
१. कोरफड लागवड करण्यापूर्वी जमीन नांगरून बेड तयार करून घ्यावेत.
२. दोन बेडमधील अंतर २ x २.५ फूट असावेत.
३. कोरफड पिकाची लागवड १ फुटावर करावीत.
४. कोरफडीचे एका एकरमध्ये १०,००० रोपे लावता येतात.
५. कोरफडीची वाढ झाल्यानंतर त्यांमध्ये इतर गवताची वाढ होणार नाही याची काळजी घ्यावी.
६. एकदा लागवड केल्यानंतर किमान ५ वर्षापर्यंत हे पीक घेता येते.

काढणी-
कोरफडीच्या पानांचे वजन ५००- ८०० ग्रॅम झाल्यास त्याची काढणी करता येते.

विक्री व उत्पन्न –
१. एखाद्या औषधी , सौंदर्य प्रसाधन बनवणाऱ्या कंपनी सोबत करार करून तुम्ही कोरफडीची विक्री करू शकता.
२. प्रति एकर २ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

कोरफडीची बाजारात मोठ्या संख्येने मागणी असते. कोरफडीची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवता येते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *