रोग आणि नियोजन

अधिक उत्पन्नासाठी आंतरपिकाची अशी घ्या काळजी

Shares

शेतकरी अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आंतरपीक घेत असतो. तर आंतरपीक म्हणजे काय तर एका पिकापेक्षा जास्त पीक एकाच शेतात, एकाच वेळी घेणे. आंतरपिकामुळे पाणी, खते, सूर्यप्रकाश, जमीन यांचा पुरेपूर वापर करता येतो. परंतु आंतरपीक नेमके कोणते घ्यावे , कोणते दोन पीक सोबत घेतल्यास नफा होईल याची माहिती असणे गरजेचे आहे. तसेच आंतरपीक घेतांना काळजी घेणे गरजेचे आहे. किंबहुना एका पिकामुळे इतर पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असते. एका पिकास कीड लागल्यास ती कीड दुसऱ्या पिकास देखील लागते. दोन्ही पिकांची काढणी एकाच वेळी असल्यास काढणी करणे शक्य होत नाही. आज आपण आंतरपिक घेतांना नेमकी काय काळजी घ्यावी हे जाणून घेणार आहोत.

आंतरपीक घेतांना घ्यावयाची काळजी –
१. एकाच वर्गातील पिके आंतरपीक म्हणून घेऊ नये. जेणेकरून जमिनीची गुणवत्ता खालावणार नाही तसेच पीक कीड , रोगास बळी पडणार नाही.
२. जास्त कालावधीचे मुख्य पीक घेत असल्यास कमी कालावधीचे आंतरपीक घ्यावे.
३. मुळे जास्त खोलवर जाणारे पीक असेल तर कमी खोलवर जाणाऱ्या पिकाची निवड करावी. जेणेकरून एकदल पिकास द्विदल पिकांपासून नत्र मिळेल.
४. भेंडी, मिरची, पपई यांसारख्या रस शोषक पिकांची एकत्रित लागवड करू नये. अन्यथा या पिकास एकसोबतच कीड , रोग होण्याची शक्यता असते.
५. शक्यतो उंच , सरळ वाढणाऱ्या पिकांची निवड करावीत. जेणेकरून दोन्ही पिकाच्या वाढीसाठी पुरेपूर जागा मिळते.
६. आंतरपीक घेतांना तणनाशकांचा वापर करणे टाळावेत.
७. मुख्य पिकातील रस शोषक किड्यांसाठी झेंडू पिकाची लागवड आंतरपीक म्हणून करावीत.
८. आंतरपीक , मुख्य पीक दोघांस पुरेपूर सूर्यप्रकाश , पाणी मिळेल याची दक्षता घ्यावी.
९. नियोजनात आवश्यकतेनुसार बदल करणे गरजेचे आहे.

आंतरपीक घेतांना मुख्य पिकाची हानी होणार नाही याची काळजी घेणे गरजचे आहे अन्यथा त्याचा आर्थिकदृष्टया परिणाम होतो. जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी पिकांची निवड , नियोजन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *