काळी मिरी कशी तयार होते
१) काळीमिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर ३ वर्षानंतर उत्पादन येण्यास सुरुवात होते.
२) मे जून महिन्यात यास तुरे येण्यास सुरुवात होते. जानेवारी ते मार्च मध्ये मिरीचे घड काढणीस तयार होतात.
३) हिरव्या मिरीचा रंग पिवळा किंवा नारंगी झाला की लगेच त्यांची काढणी करतात.
४) ही मिरी काळी करण्यासाठी दाणे पातळ फडक्यात गुंडाळतात. एका पात्रात पाणी उकळायला ठेवतात. पाणी उकळले की त्यात मिरी बांधलेले फडके १ मिनिट बुडवून ठेवतात.
५) त्यानंतर ही मिरी २ ते ३ दिवस उन्हात वाळवण्यासाठी ठेवतात. जेणेकरून मिरी जास्त काळ टिकेल.
६) पाच ते सहा किलो हिरवी मिरी वाळून दीड ते दोन किलो होते.