रोग आणि नियोजन

मोसंबी पिकाचे एकत्रित कीड व रोग नियंत्रण

Shares

मोसंबीची फळ गळती वाढली आहे. मोसंबी फळ पिकात मावा , सिल्ला , पाने खाणारी अळी , शेंडे मर , पायकूज यांसारख्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतांना दिसून येत आहे. या कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी काही उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. त्या उपाययोजना कोणत्या हे आपण जाणून घेऊयात.

एकात्मिक कीड व रोग नियंत्रण –
१. मोसंबी फळाच्या चांगल्या व जास्त उत्पादनासाठी २० किलो गांडूळ खत , ८ किलो निंबोळी पेंड प्रति झाड प्रतिवर्षी जमिनीतून द्यावे.
२. पीक संरक्षणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क व एक टक्का निंबोळी तेल यांची फवारणी करावी.
३. खवले किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस २५ ml , ४० ग्रॅम व्हर्टीसिलिम लेकॅनी १० लिटर पाण्यात मिसळून फवारावेत.
४. शेंडे मर रोखण्यासाठी पावसाळ्या पूर्वी व पावसाळ्यानंतर रोगग्रस्त फांद्या छाटून टाकाव्यात. छाटलेल्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावीत.
५. पिठ्या ढेकूण व मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट २० मिलिलिटर १० लिटर पाण्यात मिसळून फवारावेत.

अश्या प्रकारे मोसंबी पिकाच्या कीड व रोग नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *