काकडी लागवड पद्धत
काकडी हे एक भारतीय पीक आहे. या पिकाची लागवड संपूर्ण देशभर केली जाते. काकडी वेलवर्गीय भाजी असून त्याची लागवड अतिपर्जन्य प्रदेशातही करता येते. महाराष्ट्रामध्ये अंदाजे ३७११ हेक्टर जमीन काकडी लागवडीखाली आहे.
जमीन व हवामान –
१. मध्यम ते भारी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन काकडी पिकास योग्य ठरते.
२. काकडी पीक हे उष्ण व कोरड्या हवामानात घेता येते.
लागवडीचा हंगाम –
१. काकडी लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात करावी.
२. खरीप हंगामात जून , जुलै महिन्यात लागवड करावी.
३. उन्हाळी हंगामात जानेवारी महिन्यात लागवड करावी.
वाण –
१. काकडीची शीतल वाण ही जात डोंगर उताऱ्यात जास्त आणि हलक्या पावसाच्या प्रदेशात उत्तम वाढते. लागवडी नंतर ४५ दिवसांनी यास फळे येण्यास सुरुवात होते. ही फळे हिरव्या रंगाची असून याचे हेक्टरी उत्पादन ३० ते ३५ टन पर्यंत मिळते.
२. पुसा संयोग ही लवकर येणारी जात आहे. याचे हेक्टरी उत्पादन २५ ते ३० टन पर्यंत मिळते.
३. प्रिया ही संकरित जात आहे. या जातीची फळे गडद हिरव्या रंगाची असतात. याचे हेक्टरी उत्पादन ३० ते ३५ टन मिळते.
४. पूना खीरा या जातीमध्ये हिरवे आणि तांबडी अशी दोन प्रकारची फळे येतात. ती लवकर येणारी जात आहे. ही जात उन्हाळी हंगामात चांगली येते. याचे हेक्टरी उत्पादन १३ ते १५ टन पर्यंत येते.
बियाणे प्रमाण –
काकडी पिकास हेक्टरी २.५ ते ४ किलो बियाणे लागतात.
पूर्वमशागत व लागवड –
१. उभी व आडवी ढेकळे फोडून नांगरणी करावी.
२. चांगले कुजलेले ३० ते ४० गाड्या शेणखत मातीत मिसळावेत.
३. त्यानंतर एक वखरणी करावी.
४. उन्हाळी हंगामात ६० ते ७५ सेंटिमीटर अंतरावर सऱ्या पडून घ्याव्यात.
खते व पाणी व्यवस्थापन –
१. लागवडीपूर्वी काकडी पिकास ५० किलो नत्र , ५० किलो पालाश , ५० किलो स्फुरद द्यावे.
२. लागवडीनंतर १ महिन्याने नत्राचा दुसरा हफ्ता ५० किलोचा द्यावा.
३. पावसाळ्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
४. उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांच्या अतंराने पाणी द्यावे.
आंतरमशागत –
१. महाराष्ट्रात काकडीचे पीक जमिनीवर घेतले जाते. त्यामुळे लागवडींनंतर २५ ते ३० दिवसांनी पिकातील गवत काढून टाकावेत.
२. फळांचा संपर्क मातीशी नाही यावा यासाठी फळांखाली वाळलेल्या काटक्या टाकाव्यात.
काढणी व उत्पादन –
१. फळे थोडी कोवळी असल्यास तोडावेत जेणेकरून बाजारात चांगला भाव मिळतो.
२. काकडीची तोडणी दार २ ते ३ दिवसांनी करावी.
३. हंगाम व जाती नुसार प्रति हेक्टरी २०० ते ३०० क्विंटल पर्यंत काकडीचे उत्पादन मिळते.
काकडीची मागणी बाजारात वर्षभर असते. काकडीची योग्य काळजी घेतल्यास या पिकापासून भरघोस उतपन मिळू शकते.