माती परीक्षणाचे फायदे
आपण ज्या जमिनीतून शेती करतो त्या जमिनीच्या प्रकाराबद्दल , त्या जमिनीत किती आणि कोणती अन्नद्रवे आहेत हे माहिती असणे गरजेचे असते. त्यासाठी वर्षातून एकदा तरी माती परीक्षण केले पाहिजे. जमिनीमध्ये असलेल्या गुणधर्मावरून कोणते पीक घ्यावे, कशाचे उत्पादन चांगले येईल हे ठरवणे सोपे जाते. पिकांच्या वाढींसाठी सामू , चुनखडी , स्फुरद , नत्र , पालाश , झिंक , आयर्न , सल्फर, सेंद्रिय कार्बन यांची आवश्यकता असते .
काय आहे माती परीक्षण –
१. शेतजमिनीतील अंगभूत रसायने आणि जैविकांचे विश्लेषण म्हणजे माती परीक्षण होय.
२. माती परीक्षण केल्यास पिकांना किती प्रमाणात खतांची मात्रा द्यावी हे कळते.
३. जमिनीतील विद्राव्य क्षार आणि जमिनीचा ph निर्देशांक कळतो.
४. पिकांच्या वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.
५. सर्व अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेण्यासाठी माती परीक्षण आवश्यक असते.
माती परीक्षणाचे फायदे –
१. ज्या जमिनीमध्ये आपण पीक घेणार आहोत त्या मातीमध्ये किती प्रमाणात आणि कोणत्या द्रव्यांची किंवा पोषक तत्वांची मात्रा किती आहे हे कळते.त्यानुसर कोणत्या खतांची उपाययोजना करावीत हे आपल्याला कळते.
२. गैरवाजवी खाते देण्यावर नियंत्रण येते.
३. शेतातील पिकांचे योग्य नियोजन करता येते.
४. दोन पटीने अधिक आर्थिक लाभ होतो.
५. पिकांच्या लागवडीचे नियोजन करता येते.
६. जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाविषयी संपूर्ण माहिती मिळते.
माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला पिके घेण्यास मदत होईल आणि नफा जास्त होईल. तुम्ही जर अजून ही माती परीक्षण केले नसेल तर लवकरच करून घ्या. ज्याने तुमच्या जमिनीत कोणत्या पिकाचे उत्पादन चांगले होईल याची तुम्हाला कल्पना येईल.