काय असते रोपवाटिका? जाणून घ्या.
ज्या ठिकाणी पिकांच्या कलमाची आणि रोपांची निर्मिती केली जाते त्या जागेस रोपवाटिका असे म्हंटले जाते. रोपवाटिकेमध्ये रोपांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागते . त्यांनी अभिवृद्धी करणे , त्यांची जोपासना करणे गरजेचे ठरते. रोपवाटिकेची काही प्रकार पडतात ते आपण आज जाणून घेऊयात.
रोपवाटिकेची प्रकार –
१. कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका
२. शासकीय रोपवाटिका
३. मान्यताप्राप्त रोपवाटिका
४. मान्यताप्राप्त आणि पंजीकृत खाजगी रोपवाटिका
पिकांच्या वर्गीकरणावरून रोपवाटिकेचे प्रकार –
१. भाजीपाल्यांचे रोपवाटिका
२. औषधी वनस्पतीचे रोपवाटिका
३. फळझाडांचे रोपवाटिका
४. शेती पिकांसाठी रोपवाटिका
५. फक्त बी बियाणे
६. फक्त रोपांची रोपवाटिका
७. कलमांची रोपवाटिका
तसेच दुसरीकडून कलमे आणि रोपे आणून त्यांची फक्त विक्री करणे आदी
रोपवाटिकेचे महत्व –
१. शेतकऱयांना उत्पादन मिळवून देण्याचे काम फळझाडांची रोपवाटिका करते.
२. आर्थिक दृष्ट्या शेतकऱयांना स्थिर राहण्यासाठी देखील मदत होते.
३. विविध प्रकारची कलमे रोपवाटिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते.
४. शुद्ध आणि जातिवंत असे कलमे शेकऱ्यांना मिळतात.
५. कोरडवाहू क्षेत्रात उत्पादनाची शाश्वती नसतांना ही उत्पादन युक्त रोपवाटिका उपलब्ध होऊ शकतात.
६. जमीन आणि हवामान लक्ष्यात घेऊन त्यानुसार कलम घेता येते.
रोपवाटिकेचे असे अनेक फायदे आहेत. तुम्ही रोपवाटिका सुरु करू शकता किंवा रोपवाटिकेमधून रोप किंवा कलम विकत घेऊन त्याची लागवड देखील करू शकता .