योजना शेतकऱ्यांसाठी

नाबार्ड दुग्ध योजना संपूर्ण माहिती

Shares

देशातील शेतकऱ्यांना आणि बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठीकेंद्र सरकारने नाबार्ड योजना सुरु केली आहे. या योजनेच्या अंतर्गत दुग्ध व्यवसायाची व्यवस्था करण्यासाठी देशातील ग्रामीण भागातील लोकांना सरकार कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देईल. या योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागात सर्व जिल्ह्यांमध्ये आधुनिक दुग्ध शाळा स्थापन करेल. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जाईल तसेच देशातील दुग्ध उत्पादनासाठी डेअरी फार्म ची स्थापना करण्यासही प्रोत्साहन दिले जाईल.या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

या योजनेचे उद्दीष्ट –
भारतामध्ये शेतीबरोबर पशुपालन हा जोडधंदा केला जातो. पाण्यात लोक दूध व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु दुग्ध व्यवसायाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायाचे रचनाही अव्यवस्थित आहे. या योजने अंतर्गत दुग्ध व्यवसायाचे आयोजन करून योग्य रीतीने चालवले जाईल व शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. या योजनेचे उद्दिष्ट आहे की स्वयंरोजगार निर्माण करणे आणि या योजनेद्वारे दुग्ध क्षेत्रासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच व्याजा शिवाय कर्ज उपलब्ध करून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या योजनेद्वारे कोणत्या गोष्टींसाठी अनुदान मिळते? –
१. जर तुम्ही एखादा यंत्र खरेदी केले तर त्यावर तुम्हाला २५% भांडवली सबसिडी मिळू शकते.
२. अर्जदाराचा प्रवर्ग हा एससी-एसटी असेल तर अशा अर्जदारांना या योजनेअंतर्गत ४.४० लाख रुपयांची सबसिडी मिळते.
३. या योजनेमध्ये कर्जाची रक्कम थेट बँक मंजूर करते.
४. तुम्हाला पाच पेक्षा कमी गाईंची डेरी सुरू करायचे असेल तुम्हाला त्यांच्या खर्चाचा पुरावा देऊन या योजनेअंतर्गत सरकारकडून पन्नास टक्के अनुदान मिळते.
५. या योजने अंतर्गत दुग्धजन्य उत्पादने युनिट सुरूकरण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते.
६. या योजनेअंतर्गत शेतकरी दुधाच्या उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी उपकरणे खरेदी करू शकतील.

या योजनेसाठी पात्रता –
१. योजनेअंतर्गत शेतकरी, वैयक्तिक उद्योजक, स्वयंसेवी संस्था, कंपन्या, असंघटित आणि संघटित क्षेत्र आणि गट इत्यादी पात्र आहेत.
२. या योजनेअंतर्गत एका व्यक्तीला फक्त एकदाच लाभ घेता येतो.
३. योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त सदस्यांना मदत करता येते.त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसह स्वतंत्र युनिटउभारण्यासाठी साठी मदत केली जाते.अशा दोन युनिटमधील अंतर हे पाचशे मीटर असावे.
४. या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीला सर्व घटकांसाठी मदत मिळू शकते परंतु प्रत्येक घटकासाठी फक्त एकदाच मदत मिळते.

योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकते –
१. शेतकरी
२. उद्योजक
३. शेतकरी कंपन्या
४. सरकारी संस्था
५. संघटित गट
६. असंघटित क्षेत्र

ऑनलाईन अर्ज कसा करावा ? –
१. नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतो.
२. नाबार्डच्या वेब साईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडते.
३. होम पेजवर तुम्हाला इन्फॉर्मेशन सेंटर असा एक पर्याय दिसतो.
४. या पर्यायावर क्लिक करून त्यानंतर एक पेज तुमच्यासमोर उघडते.
५. त्यानंतर या पेजवर योजनेवर आधारित पीडीएफ डाऊनलोड करण्याचा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून योजनेसंबंधी चा संपूर्ण फार्म तुमच्यासमोर उघडेल.
६. नंतर हा फॉर्म भरून सबमिट करावा लागतो.

अश्याप्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *