पिकपाणी

लेमन ग्रासची शेती करा आणि लखपती व्हा

Shares

आजचे युग पाहिले तर बाजारामध्ये आरोग्यासाठी लागणाऱ्या गोष्टींना ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. जर ग्रामीण भागात राहून तुम्हाला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर लेमन ग्रास उत्तम व्यवसाय आहे. लेमन ग्रास हे आरोग्यदायक पीक आहे. पारंपारिक शेती सोबतच आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या पिकांची मागणी मोठया प्रमाणात वाढलेली आहे. तुम्ही नगदी पिकाच्या शेतीमधून लाखो रुपयांची उलाढाल करू शकता. सध्याच्या काळानुसार लेमन ग्रासची शेती करणे खुप फायदेशीर ठरणार आहे. लेमन ग्रास या गवताची लागवड करायची असेल तर फक्त २० हजार रुपये खर्च आहे परंतु या शेतीच्या माध्यमातून महिन्याला ४ लाख रुपये पर्यंत उत्पन्न घेऊ शकते.

पारंपारिक पद्धतीने जी केलेली शेती असते त्या शेतीला खताची गरज असते, पण लेमन ग्रासच्या शेतीला कोणत्याही खताची गरज भासत नाही. त्यासोबतच गुरे किंवा जंगली प्रकारच्या जनावरांपासून या शेतीला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. आपण एकदा पेरणी केल्यावर सहा ते सात वर्षे लेमन ग्रासचे पीक येतच राहते. एकदा पेरणी केली की सहा ते सात वेळा लेमन ग्रासची कापणी केली जाते. लेमन ग्रास पासून तेल सुद्धा निघते. बाजारपेठेत लेमन ग्रासला मोठी मागणी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काही महिन्यांपूर्वी “मन की बात” या विषयाला धरून लेमन ग्रास शेती बद्दल संभाषण केले होते. लेमन ग्रासच्या शेती मधून शेतकऱ्यांना तसेच व्यवसाय करणाऱ्या इच्छुकांना यामधून चांगले उत्पन्न मिळू शकते. लेमन ग्रासच्या माध्यमातून कॉस्मेटिक, साबण, तेल तशी वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक औषधे तयार होतात. सध्या बाजारात अशा गोष्टींना मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे लेमन ग्रासला मोठ्या प्रमाणात महत्त्व मिळू लागले आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे दुष्काळ ग्रस्त भागामध्ये सुद्धा लेमन ग्रासची शेती करता येते. आपण जर व्यवसायाच्या दृष्टीने एका एकरात लेमन ग्रासची शेती केली तर महिन्याला साधारणपणे ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

अशाप्रकारे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या या लेमन ग्रासची लागवड आपल्याला भरपूर फायदा मिळवून देते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *