प्रत्येक गांव स्मार्ट होण्याची गरज
स्मार्ट सिटी जर शहराबाहेर साकारली जाणार असेल तर तीनशे चारशे एकर जमीन ताब्यात घेतली जाईल .त्यासाठी किती किंमत दिली जाईल ? कुणाकुणाचा लाभ होईल ? किती जंगल नष्ट होईल ,टेकड्या उध्वस्त होतील .वन्य पशुंचे मुळ आश्रय स्थान नष्ट होऊन ते स्थलांतरित होतील .कसेतरी तग धरून असलेल्या वनांचा नाश होईल .जमिनींचे अवास्तव सौदे होतील .बाधकाम करणाऱ्या कंपन्या ,ठेकेदार ,बांधकाम साहित्याचे व्यापारी यांची पळापळ सुरु होऊन संबंधित सरकारी अधिकारी,नेतेमंडळी ,समाजावर दबाव ठेऊन असणारे बाहुबली सर्वजण सक्रीय होतील .प्रत्येक साध्या साध्या गोष्टींसाठी “फिल्डिंग “ लावली जाईल .अब्जावधी रुपयांसाठी रस्सीखेच सुरु होईल .कोणतीही योजना साकारतांना लोकशाही प्रणालीतील अनेक अडथळे, धोके पार करून ही प्रस्तावित “ सिटी ‘ साकारली तर तिथे राहायला कोण जाऊ शकेल ?
आता फक्त नैसर्गिक सुगंध असलेला अस्सल बासमती तांदूळच बाजारात विकला जाईल, FSSAI चे नवे नियम ऑगस्टपासून लागू होणार
तिथे काय भाव असेल ?कोणत्याही मार्गाने धनाढ्य ,अब्जाधीश झालेल्यांनाच फक्त स्मार्ट सिटीत जागा घेणे शक्य होणार आहे .मात्र स्मार्ट सिटी टॅक्स सर्व शहरवासीयांना भरावा लागेल .सामान्य नागरिक मध्यमवर्गीय यांचे स्मार्ट सिटीत काय स्थान असणार आहे ?समाजातील गरीब घटक, शेतकरी यांच्यासाठी हा विषय नाहीच ,कारण निवडणुकांसाठी अजून वेळ आहे .
तूरडाळीचे दर कमी करण्यासाठी केंद्राचा प्लान, १० लाख टन तूर आयात करणार !
स्मार्ट सिटी उभारण्यात लागणारा पैसा हा म.न.पा.,राज्य शासन व केंद्र शासनाचा आहे , म्हणजेच पर्यायाने प्रत्येक भारतीय नागरिकाचा आहे .त्यामुळे या योजनेद्वारे आजचे आपले शहर स्मार्ट सिटीत रुपांतरीत व्हावे असे वाटणे गैर नाहीच .या अनुदानाचा वापर करून आजचे आपले शहर दर्जेदार व्हावे हि शहरवासीयांची अपेक्षा आहे ,मागणी आहे . आपले शहर दर्जेदार स्मार्ट होणे म्हणजेच ……
गव्हाच्या निर्यातीवरील बंदी सरकार हटवणार?
[१] संपूर्ण शहरातील रस्ते road normsप्रमाणे बनवून योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर्स ,रंगीत पट्टे ,झेब्रा क्रॉसिंग व्हावे .’ रस्ते स्मार्ट तरच सिटी स्मार्ट ‘
[२] शहर १००% स्वच्छ असावे .कचरा व्यवस्थापन अत्याधुनिक असावे.
[३] सर्व प्रकारचे प्रदूषण मुक्त शहर .
[४] २४ तास वीज उपलब्धी .
[५] २४ तास पाणी उपलब्ध व्हावे .
[६] भुयारी गटार योजना कार्यान्वित होऊन कुठेही उघड्या नाल्या / नाले नकोत .
[७] अद्ययावत वाहतूक व्यवस्था व्हावी .आवश्यक तेथे सब-वे, उड्डाण पुलाचे निर्माण होऊन रहदारी नियंत्रित राहावी .
[८] मोकाट जनावरांना संपूर्ण प्रतिबंध हवा.
[९] सर्व रोगांची चिकित्सा ,उपचार होर्इल असे सुपर स्पेशिअलिटी हॉस्पिटल व्हावे .
[१०] शहराच्या प्रत्येक सेक्टर [विभाग] साठी वेगळा मार्केट झोन असावा .
[११] सौर उर्जेचा वापर अनिवार्य करावा .
[१२] वाटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य करावी .
पीएम किसान: पीएम किसानच्या हफ्त्यात होणार वाढ ? 3 ऐवजी 4 हफ्ते मिळणार
या अशा शहराच्या अनेक सुविधा आहेत .
गगनचुंबी इमारती एवढाच स्मार्ट सिटीचा मापदंड नसून आपले शहर स्वच्छ ,स्वस्थ –आरोग्य संपन्न नागरिक असलेले आणि सर्व दृष्टीने सुरक्षित शहर असावे हीच आपली सर्वांची अपेक्षा आहे* .हे सर्व मापदंड पळून प्रत्येक गांव स्मार्ट होण्याची गरज आहे .
लेख संग्रह : – घे उंच भरारी (२०१६)
लेखक : – सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी ,अमरावती ४४४६०६
मोबा : 9405349354
शेणावर चालणारा ट्रॅक्टर आला, असा चालेल, काय असेल खासियत
सर्वसामान्यांसाठी खूप आनंदाची बातमी! सर्व खाद्यतेल झाले स्वस्त, तात्काळ लेटेस्ट दर तपासा
चांगली बातमी! आगामी अर्थसंकल्पात ग्रामीण आणि पायाभूत सुविधांवर भर, किती खर्च होणार जाणून घ्या
चांगली बातमी! तीन नवीन सहकारी संस्थांच्या स्थापनेला हिरवा कंदील, शेतकऱ्यांना होणार फायदा
पाकिस्तानमध्ये पीठ, तेल आणि कांद्याचे संकट,भारतावर होतील “हे” परिणाम!