कोबीचे गुणकारी फायदे आपल्याला माहिती आहे का?
आपण भरपूर वेळा आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या गोष्टी न खाता त्या खाणे टाळतो आणि रोजचा आहार योग्य नसल्याने आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. रोजचा आहार हा पोष्टिक असण्यासाठी आपण या आहारामध्ये कोबीचा सामावेश करायला हवा. कोबीचे असे अचंबित करणारे फायदे हे समोर आले आहेत.
काय आहे कोबीचे फायदे ?
१) कोबी जर आपण नियमित खात असाल तर ज्यांना बद्धकोष्ठता, पोटफुगी, पोटदुखी, गॅस व पोट साफ न होणे अशा प्रकारचे त्रास असतील, तर कोबी या सर्व त्रासांवर गुणकारी ठरते. आपण जेवताना देखील कच्ची कोबी खाली तर आपली पचन शक्ती वाढते.
२) कोबी मुळे आपल्या शरीरातील मेटाबॉलिजम योग्य पद्धतीने काम करते. मेटाबॉलिजम हे आपण सेवन केलेल्या आहाराचे ऊर्जेत रूपांतर करते, त्यासोबतच शरीरातील वेगवेगळ्या पेशी तयार करण्याचे काम मेटाबॉलिजम करत असते त्यामुळे कोबीचे सेवन केल्याने शरीरातील क्रिया योग्य पद्धतीने काम करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
३) कोबीचे सेवन करणे अतिशय महत्त्वाचे आहे, कोबीमध्ये अतिदुर्मिळ आणि शरीरासाठी हितकारक असणारे विटामिन-यू हे कोबीच्या रसात मोठ्या प्रमाणात असते. विटामिन -यू हे अल्सर आणि शारीरिक व्याधींसाठी गुणकारी ठरते.
अशाप्रकारे कोबी आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. कोबीचा आपल्या आहारात जास्त समावेश असावा.