मटार मध्ये दडलंय आरोग्याचे रहस्य
आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेत असताना आपण नेहमी सकस आहार घ्यायला हवा. हे करताना बऱ्याचदा प्रश्न पडतो की काय खायला हवे आणि काय नाही. ऋतुमानानुसार आपण आपल्या अन्नपदार्थांमध्ये सुद्धा बदल करायला हवेत, जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्यातून आपल्याला पौष्टिक आहार मिळेल. मटार हे थंडीच्या ऋतू मध्ये मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असतात. थंडीमध्ये मटार हे आपण अवश्य आपल्या जेवणामध्ये सामाविष्ट करायला हवे. मटार मध्ये लोह, जस्त, मॅग्नीज मोठ्या प्रमाणात असते. मटार खाण्याचे अनेक फायदे आहेत.
जाणून घेऊया मटार खाण्याचे फायदे :-
१) मटार हे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते आणि त्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते.
२) जर तुम्ही रक्तदाबामुळे त्रस्त असाल तर तुम्ही मटार चे सूप नक्की प्यायला हवे त्यामुळे रक्तदाबाचा त्रास कमी होतो.
३) मटार मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे मटार हे बद्धकोष्ठतेच्या त्रासावर अधिक परिणामकारक आणि फायदेशीर ठरते.
४) हाडांच्या मजबुतीसाठी मटार खाणे उपयुक्त ठरते. मटार मध्ये ‘क’ जीवनसत्त्व असल्याने शरीरासाठी मटार उपयुक्त ठरते.
५) भाजले, पोळले किंवा चटका बसला की त्या जागेवर आपण थंड वस्तू लावतो पण आपण त्या सोबतच भाजलेल्या ठिकाणी मटारची पेस्ट करून लावली तर लगेच आराम मिळतो आणि होणारी जळजळ देखील कमी होण्यास मदत होते.
६) मटारची पेस्ट करून तिचा वापर स्क्रब सारखाही करतात, त्यामुळे त्वचा उजळून दिसते.
अशी ही बहुगुणी मटार आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय फायद्याची ठरते.