बी टी कपाशीवरील कोळी:ओळख व व्यवस्थापन
या किडीचा प्रादुर्भावामुळे पाने वरच्या बाजूला आकसलेली दिसतात. हिरव्या पानावर टाचणीच्या टोकासारखे कोळी पिवळसर पांडूरके ठिपके दिसतात. असे असंख्य ठिपके नंतर एकामेकांत मिसळतात व अशी पाने नंतर पिवळसर दिसतात. पिवळ्या पानाचे निरीक्षण केल्यास आपणास पानाच्या खालच्या बाजूला लाल कोळीचे सुक्ष्म जाळे दिसतात. काही पानाच्या मध्यभागी पानाच्या मुख्य शिरेभोवती हलके तपकीरी चट्टे पडल्यासारखे दिसतात करपल्यासारखे ठिपके (अनियमीत) दिसतात. जास्त प्रादुर्भात असल्यास संपूर्ण पाने पिवळे पडून वरच्या बाजूला आकसुन वाळतात व गळून पडतात व पूर्ण झाड पर्णहीन होते. ही अवस्था प्रामुख्याने कपाशीच्या बोंडे भरण्याच्या ते फूटण्याच्या अवस्थेत दिसत असल्यामुळे बॉडातील सरकी भरत नाही, अपरिपक्व अवस्थेत बोडे फुटतात व पर्यायाने उत्पादनामधे घट होते.
कोरडवाहू कपाशीमधे पाण्याचा ताण पडल्यामुळे पाने मलूल व निस्तेज पडलेली दिसून येतात तसेच पाने पिवळसर होतात. अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास शेतकरी बंधूचा नेमका कोळीमुळे पिकास झालेला प्रादूर्भाव ओळखण्यात गोंधळ उडतो व काय करावे हे समजत नाही. म्हणून पिकाने नियमित सर्वेक्षणामधे करून नेमकी समस्या ओळखून वेळीच योग्य उपाय याजावेत.
सद्यस्थितीत कोरवाहू कपाशीला पाण्याचा ताण बसत असून जमिनीला भेगा पडल्या आहे. दिवसाचे वातावरण उष्ण व कोरडे असून असे हवामान या किडीसाठी पोषक आहे.
कीवी शोळन: योग ठिपक्याचे कोळी-आकाराने सुक्ष्म (०.३ ते ०.४ मीमी) असून भिंगाच्या सहाय्याने दिसतात. ते हिरवट पिवळे ते केसरी रंगाचे असून पाठीवर दोन्ही बाजूने दोन काळे ठिपके दिसतात. नुकत्याच अंडयातून निघालेल्या अळीला सहा पाय असतात तर प्रौढ व पिल्लांना आठ पाय असतात. या सर्वच अवस्था कपाशी पिकांना नुकसान कारक असून ते सोडेच्या सहाय्याने पानाच्या पेशीमधील रस शोषण करतात. हा कोळी जाळे विणतो व असे जाळे आपण प्रादुर्भावगस्त पानाच्या खालून पाहू शकतो. हा कोळी सोयाबीन, भेंडी, भाजीवर्गीय पिके, कडधान्ये, तेलबीयावर सुध्दा आढळून येतो.
जिवनका:
प्रौठ कोळी हिवाळ्यात जिवंत सहन वर्षभर सक्रीय असतात. या किडीला पंख नसल्यामुळे तीचा प्रसार सरपलटत वालून तसेच हवेन्दारे होतो. मादी अंडी पानाखाली घालते. एक मादी तीच्या ३० दिवसाच्या कार्यकाळात साधारणपणे १०० अंडी देते.
त्यांच्या पाच अवस्था असतात (अंडी, अळी, पिल्ले (प्रोटोनीम्फवडयुटोनिम्फ) व प्रौढ). एक पिढी कमीतकमी ४ ते ५ दिवसाची असु शकते. छोटया व एकापाठोपाठ पिठया व जास्त अंडी देण्याची क्षमता असल्यामुळे या किडीचा उठेक होण्याची तसेच त्यांचेमधे प्रतिकार क्षमता निर्माण होण्याची दाट शक्यता असते. किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारण पानाच्या देठाभोवती, मुख्य शिरेच्या आजूबाजूला व पाने मुडपण्याचे ठिकाणी एकवटला असतो.
लाल कोळी-लाल रंगाचे कोळी सुक्ष्म असून ते जाळे विणतात. पिल्ले हिववट रंगाचे असून शरीरावर गर्द ठिपके असतात. ते प्रामुख्याने पानाच्या खालच्या बाजूने उपजिविका करतात. प्रौढ अवस्था सर्वसाधारण १० दिवासाची असते. भाजीपाला पिके व शोभेची झाडे यावर या किडीचा प्रादुर्भाव जास्त असतो.
पिवळे कोळी– लाल कोळी पेक्षा सुक्ष्म, पिवळसर रंगाचे असून पाठीवर पांढूरक्या रेषा असतात. भिंगातून पाहील्यास स्पष्ट दिसतात. हे कोळी जाळे विनत नाही. यांची वाढ ४ ते ५ दिवसात पूर्ण होते (२२.५°से. ते २७.० से.).मादी सरासरी ५ ते ८ अंडी देते. हा कोळी पांढन्या माशीच्या पायाला चिकटून इतरत्र पसरतो. किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने नवीन व कोवळया पानावर जास्त असतो. संपूर्ण वाढ झालेली अळी सुप्तावस्थेत (३ ते ११ दिवस ) जाते. व त्यानंतर प्रौढावस्थेत परावर्तीत होते.
एकीकृत व्यवस्थापन
• कापूस पीकाची योग्य पीक फेरपालट करावी.
• कपाशीत चवळीचे आंतर पीक घ्यावे या वळी पीकावर कपाशीवरील किडीच्या नैसर्गिक शत्रू किटकांचे पोषण होईल
• वेळेवर आंतर मशागत करून पीक तणविरहीत ठेवावे त्यामुळे किडीच्या पर्यायी वाघ तीचा नाश होईल.
शेताच्या बांधावरील कपाशीवरील किडीच्या पर्यायी खापतये जसे उदा. अंबाडी, हॉलीहोंक, रानभेंडी ई.कावून
नष्ट करावी . मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करून दोन ओळीतील बहीन आठातील अंतर योग्य तेच ठेवावे
आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा त्यामुळे कपाशीचे पीक टाटणार नाही पर्यायाने अशा पीकावर कितही कमी प्रमाणात राहील.
• वेळोवेळी प्रादूर्भावग्रस्त पाने जमाकरून किडीसहीत नष्ट करावी.
• रस शोषक किडीवर उपजिवीका करणारे नैसर्गिक किटक उदा. सीरफीठ माशी, कालीन, बालकिडे, कायसोपाई संख्या पूरेशी आढळून आल्यास रासायनिक कोळीनाशकांचा वापर टाळावा.
. कपाशीच्या अलीकडील काळात येणा-या रस शोसक किडीचे (मावा, तुडतुडे, फुलकिडे ) नियंत्रणासाठी शिफारशीत रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा व बहुआयामी (बॉडस्पेक्ट्रम) किटकनाशकांचा अवास्तव वापर केल्यास व एकापेक्षा जास्त किटकनाशकाचे फवारणीमध मिश्रण केल्यास या किडीचा प्रदूर्भाव वाढतो.
• लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास कपाशीवर कोळी या किडीचा पादुर्भाव आढळल्यास डायकोफॉल १८.५ टक्के
५४ मि.ली. किंवा स्पायरोमेसीफेन २२.९ टक्के १२ मि.ली. यापैकी कोणत्याही एका किटकनाशकांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी।