इतर बातम्यायोजना शेतकऱ्यांसाठी

दुग्ध व्यवसायासाठी बिना गॅरेंटी ४ लाखांचे लोन

Shares

शेतकऱ्यांना शेती साठी तसेच शेतीबरोबर जोडधंदा करण्यासाठी सरकार विविध योजना, कार्यक्रम राबवत असते. तर आता भारतीय स्टेट बँक (SBI) डेअरी व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी बिना गॅरेन्टी लोन देणार आहे.

हे ही वाचा (Read This) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज

पशुपालक बँकेकडून गाई-म्हशींचे दुग्ध व्यवसायाच्या विस्तारासाठी हमीशिवाय ४ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात.

किती मिळणार लोन ?

  • एसबीआर्ड (SBRD) स्वयंचलित दूध यंत्र, दूध संकलन इमारत बांधकाम, दूध संकलन यंत्रणा, वाहतूक यासाठी बँक लोन देणार आहे.
  • हे कर्ज शेतकऱ्यांना ०.८५% ते २४% व्याजदराने देण्यात येणार आहे.
  • कर्ज परतफेड करण्याचा कालावधी ६ महिने ते ५ वर्षे पर्यंत असेल.
  • स्वयंचलित दूध संकलन प्रणाली मशीनसाठी १ लाख रुपये तर दूध संकलन इमारतीच्या बांधकामासाठी २ लाख रुपये देण्यात येईल.
  • दूध वाहतूक करणाऱ्या वाहनासाठी ३ लाख रुपये देण्यात येईल.
  • दुध चिलिंग यंत्र बसवण्यासाठी ४ लाख रुपये देण्यात येईल.

हे ही वाचा (Read This) नाबार्ड डेअरी योजना, ५० टक्के अनुदान

पात्रता

  • दररोज किमान १ हजार लिटर दूध पुरवठा असणे आवश्यक आहे.
  • या व्यवसायातून गेल्या 2 वर्षातच नफा कमावला असावा.
  • मागील २ वर्षातील बॅलन्स शीट ऑडिट केलेले असावे.
  • बॅलन्स शीट चा ग्रेड A असावा.

अर्ज कसा करावा ?

या योजने संबंधित संपूर्ण माहिती जाणून घ्याची असेल आणि अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या SBI केंद्राशी संपर्क साधावा लागेल.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *