तूर खरेदी १९ केंद्र सुरु,६३०० रुपये हमीभाव,नोंदणी आवश्यक
तूर खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात १९ केंद्र सुरु करण्यात आले असून यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने आत २० डिसेंबर पासून एनईएमएल पोर्टलवर तूर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु केली आहे. यासाठी जिल्ह्यात १९ केंद्र मंजूर करण्यात आला असून तुरीस ६ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याचे मार्केटिंग फेडरेशन कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
कोणती आहेत ती केंद्रे ?
श्री.स्वामी समर्थ सेवा संघ गुंजोटीसाठी उमरगा, विविध कार्य सेवा सह, संस्था लि.गुंजोटी, दिनकरराव जावळे पाटील अॅग्रो फुड कंपनी नागुर यांच्यासाठी खरेदी केंद्र उमरगा येथील मुरुम, लोहारा तालुक्यातील यशवंतराव चव्हाण कृषी उत्पन्न वि.संस्था नागुरसाठी, जगदंब खरेदी विक्री सह. संस्था लोहारासाठी कानेगाव, दस्तापूर विविध कार्य सेवा सह. संस्था दस्तापूर यांच्यासाठी खरेदी केंद्र दस्तापूर, तुळजापूर तालुक्यातील ता. शेतकरी सह ख.वि.संघ लि. तुळजापूर, श्री. खंडोबा पणन सहकारी संस्था अणदुर (नळदुर्ग), कळंब तालुक्यातील एकता खरेदी विक्री सह संस्था उस्मानाबादसाठी कळंब, राजमाता कृषी पुरक सेवा पुरवठा सहकारी संघ चोराखळी, भूम तालुक्यातील श्री. शिवाजी भूम तालुका शेतकरी सहकारी ख. वि. संघ भूम, तनुजा महिला शेतीपुरक संस्था सोन्नेवाडीसाठी इंट, कै. उत्तमराव सोन्ने कृषीमाल पु. सह. सं.म. सोन्नेवाडी,वाशी तालुक्यातील तालुका शेतकरी सह संस्था लि. वाशी, के. बलभिमराव देसाई पवार कृषी प्रक्रिया सह संस्था मर्या. पारगाव, परंडा तालुक्यातील साई कृपा कृषी पुरक सह.
नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे
तूर हमीभाव योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. हा ऑनलाईन अर्ज करतांना खाली दिलेल्या कागदपत्रांची आवशयकता असते.
७ /१२ उतारा (यावर तूर पिकाची नोंद असणे गरजेचे आहे )
आधार कार्ड
बँक पासबुक झेरॉक्स
केंद्रावर तूर विक्रीसाठी आणतांना ती स्वच्छ धुवून तिला नीट वाळवून आणावी. असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सोमारे यांनी केले.