इतर बातम्या

वा रे पठ्या, कलिंगडाची लागवड करून कमवले १३ लाख ३२ हजार

Shares

सध्या युवा वर्ग हा शेती व्यवसायाकडे वळताना दिसत आहे. अनेकांनी अगदी कमी वेळात भरगोस उत्पन्न घेऊन दाखवले आहे. असाच एक प्रयोग धुळे मधील एका तरुण शेतकऱ्याने केला आहे. त्याने अवघ्या ७५ दिवसात कलिंगड म्हणजेच टरबूजच्या उत्पादनातून १३ लाख ३२ हजार रुपयांची कमाई केली आहे.

हे ही वाचा (Read This ) ५० हजारात सुरु करा हा व्यवसाय, कमवा ५ लाख रुपये, सरकार देणार ४०% अनुदान

त्याने सुरुवातीपासूनच योग्य नियोजन तसेच मार्गदर्शन घेऊन कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. या तरुण शेतकऱ्याचे नाव सागर पवार असून त्याने बीएससी ऍग्री मधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्याला सुरुवातीपासूनच शेतात विविध निरनिराळे प्रयोग करण्यास आवडत होते. त्याने आधुनिक तत्रंज्ञानाचा वापर करून कलिंगडाची लागवड केली होती.

ज्या जमिनीवर त्याने कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे ती जमीन वडिलोपार्जित असून पूर्वी या जमिनीवर भाजीपाला, कापूस, कांदा अशी विविध पिके घेतली गेली होती. मात्र नफा तसेच खर्च याचा काहीही ताळमेळ बसत नव्हता. त्यामुळे पर्यायी पीक घेण्याचे सागरने ठरवले.

कशी केली कलिंगडाची लागवड?

या तरुण शेतकऱ्याने पाच एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपर अंथरुन ठिबक सिंचन केले. त्यानंतर दीड फूट अंतरावर एक कलिंगडाचे रोप याप्रमाणे ५५ हजार रोपांची लागवड केली. ८ ते १० दिवसांच्या अंतराने कलिंगडाला खतांची मात्रा देण्यात आली. याचाच परिणाम म्हणून केवळ ७५ दिवसांमध्येच कलिंगड बाजारात विक्रीसाठी दाखल झाले.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

पिकांच्या उष्णतेसाठी तीन ते चार टन कोंबडी खत वापरण्यात आले. त्यासोबतच मायक्रोन मल्चिंग पेपरचा वापर करत प्रति एकरी सुमारे आठ हजार रोपांची लागवड केली. हा पेपर वापरल्याने पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होण्यास मदत झाली.

वेलवर्गीय पिकांवर व्हायरस तुडतुडे मावा या रोगांचा प्रादुर्भाव होतो हा रोखण्यासाठी त्याने चिकट फळमाशी, लिमडा, नीम ऑईल याचा वापर केला. आधुनिक पद्धतीचा वापर करून या तरुण शेतकऱ्याने विक्रमी उत्पादन घेतले आहे.

उत्पादन आणि विक्री

केवळ पंच्याहत्तर दिवसातच कलिंगड बाजारात विक्रीसाठी दाखल झाले असून यातून सागरला तब्बल १३ लाख ३२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र स्थानिक बाजारपेठेत विक्री न करता या शेतकऱ्याने दिल्लीच्या व्यापाऱ्यांशी त्याने संपर्क साधून विविध देशातील बाजारपेठेत कलिंगड विक्रीसाठी पाठवले.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *