इतर बातम्याबाजार भाव

कांद्याच्या दरात जोरदार घसरण, आता एकच पर्याय !

Shares

महाराष्ट्रामध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तर यंदा इतर शेतमालाच्या दराबरोबर कांद्याच्या दरात देखील चढ उतार होतांना दिसत आहे. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.

शासनाने कांदा निर्यातीच्या धोरणाला प्रोत्साहन द्यावे तसेच पुढील २ महिन्यानंतर नाफेडने जास्तीत कांद्याची वाजवी दरात खरेदी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केली आहे.

हे ही वाचा (Read This ) भरघोस उत्पन्नासाठी पपई लागवड करण्याची हीच योग्य वेळ – कृषी तज्ज्ञांचा सल्ला

शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत असल्यामुळे सरकारची भूमिका काय असेल?

कांदा लागवड पासून ते साठवणूक, विक्री व्यवस्थापन यामध्ये उत्पादकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. तसेच वीज, पाणी, इंध दरवाढ, खतांच्या वाढत जाणाऱ्या किंमती याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला.
अश्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी कांदा निर्यातीस प्रोत्साहन द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कांद्याचे दर वाढतात तेव्हा सरकारकडून दर कमी करण्यासाठी हालचाली केल्या जातात. कांद्याच्या दरात घसरण होत असताना राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणत्याही हालचाल होत नाहीत. सरकार याबाबत काहीच भूमिका घेतल नसल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कांद्याचे दर

kandyache bhav

कांद्याला मिळतोय कवडीमोलाचा दर

सध्या नाशिकच्या बाजारपेठांमध्ये कांद्याला १३ ते १४ रुपयांचा प्रतिकिलोला दर मिळत आहे. या दरातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे कांद्याला प्रतिकिलो ३० रुपयांचा दर मिळावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे.

हे ही वाचा (Read This ) सोयाबीनचे दर लवकरच ९ ते १० हजारांवर जाणार? काय आहे कारण वाचा.

राज्यातील नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. याबाबत आम्ही लवकरच सरकारला अधिकृत निवेदन देणार असल्याचे भारत दिघोळे यांनी सांगितले.

देशभर महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात केली जात असून सरकाने लवकरात लवकर काही ठोस पावले उचलावीत असे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष यांनी सांगितले आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *