दिल्लीत पुन्हा शेतकरी आंदोलन होणार ? शेतकरी नेते- राकेश टिकैत
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी एमएसपीवर समिती स्थापन करण्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. केंद्र सरकार एमएसपीवर समिती स्थापन करण्याच्या नावाखाली फसवणूक करत असल्याचं शेतकरी नेत्याने आरोप केला. राकेश टिकैत यांनी आज ट्विट करून सरकारने त्यांची मागणी मान्य न केल्यास देशभरात शेतकरी आंदोलनाची पुनरावृत्ती केली जाईल, असे सांगितले आहे.
‘केंद्र सरकार एमएसपीवर समिती स्थापन करण्याच्या नावाखाली फसवणूक करत आहे. एसकेएममधून ३ नावे घेऊन समितीचे स्वरूप आणि योजना सांगायलाही नको. या फसवणुकीला उत्तर देण्यासाठी पुन्हा देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन होईल. मात्र हे आश्वासन केंद्र सरकारने अद्याप पूर्ण केलेले नाही. किसान मोर्चा एमएसपी हमीभावासाठी केंद्र सरकारच्या विरोधात नवीन आंदोलन सुरू करण्याचा विचार करत आहे.
सरकार आश्वासन पूर्ण करू शकले नाही, तर तीव्र आंदोलन करू, असे या आधी शेतकरी नेत्याने म्हटले होते. सरकारने टेबलावर बसून बोलावे, तसेच एक वर्षाचे आंदोलन संपले, अनेक शेतकऱ्यांचे पीकही काढले नाही, त्याचा हिशोब इतक्या लवकर कसा होणार ?
सध्या खरी लढाई आंदोलनासाठी व्यासपीठ तयार करण्याची आहे. शेतकरी नवा नारा घेऊन चालत आहेत, शेतकरी शहीद झाले आहेत, सरकार आम्हाला त्यांचे आकडे विचारत आहे. शेतकऱ्यांच्या हौतात्म्याची आकडेवारी संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन सरकारने मिळवावी, असं शेतकरी नेत्याचं मत आहे, किमान आधारभूत किमतीतून (एमएसपी) तूट असेल तर त्याचा नफा-तोटा सरकारने सांगावा.