सोयाबीनची 9 हजारांकडे वाटचाल? जाणून घ्या आजचे दर
सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार होतानाचे चित्र आपण पहिले आहे. तर आता हंगामाच्या शेवटी देखील सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार होत आहे.
मध्यंतरी दरात स्थिरता असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी इतक्या दिवसापासून साठवणूक केलेल्या सोयाबीनची विक्री केली आहे. त्यामुळे आता काही प्रमाणातच सोयाबीन साठवणूक केलेला असला तरी खरिपात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दराकडून खूप अपेक्षा आहेत.
हे ही वाचा (Read This ) हायब्रीड कारले लागवडीतून घ्या भरगोस उत्पन्न
गेल्या काही दिवसांपूर्वी सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाली होती. मात्र नंतर दरामध्ये घसरण होऊन दर हे ७ हजार ४०० वर स्थिर होते, मग पुन्हा दरात ७० रुपयांची वाढ झाली होती.
मात्र आता सोयाबीनचे दर हे सोयाबीनला जास्तीतजास्त ७ हजार ४०० तर कमीतकमी ४ हजार ५०० रुपयांवर स्थिर होते.मात्र आता दरामध्ये वाढ होतांना दिसत आहे. तर आता सोयाबीनचे दर हे जास्तीत जास्त ७ हजार ६-०० तर कमीत कमी ६ हजार ५०० वर पोहचले आहे.
सोयाबीनचे आजचे दर
उन्हाळी सोयाबीन
यंदा उन्हाळी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. उत्पादनवाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे सोयाबीन हे बहरात असून आता काढणी कामाला सुरवात होणार आहे. पण याची काढणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
सोयाबीनच्या शेंगा ९० टक्के पिवळ्या झाल्यावरच काढणी योग्य राहणार आहे. उशिर झाला तर मात्र दाणे गळण्याचा धोका निर्माण होतो.शेतकऱ्यांनी स्प्रिक्लंर, ठिबकचा वापर करून पिकाची जोपासना केली आहे. सोयाबीनला मुबलक दर मिळाले नाही तरी भविष्यातील बियाण्यांचा प्रश्न मिटणार आहे.
उन्हाळी सोयाबीनचा पेरा मोठ्या संख्येने झाल्यामुळे खरिपातील बियाण्यांची चिंता मिटली असून शेतकऱ्यांची धावपळ कमी होणार आहे. इतकेच काय तर बियाण्यांची खरेदी करतांना होत असलेली फसवणूक टळणार आहे.
हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र