सोयाबीन ८ हजार करणार का पार ? जाणून घ्या आजचे दर
खरीप हंगामातील पिके आता अंतिम टप्यात असले तरी सोयाबीनची चर्चा ही अजूनही सुरु आहे याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांनी केलेली सोयाबीनची साठवणूक.
मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर हे ७ हजार ३५० वर स्थिरावले होते. मात्र त्यानंतर सोयाबीनच्या दरामध्ये काही प्रमाणात घट झाली आणि सोयाबीनचे दर हे ७ हजारांवर स्थिरावले. याचा परिणाम आता सोयाबीन आवक वर होतांना दिसून येत आहे.
मागील आठवडाभरापासून बाजारपेठेत सोयाबीनचे भाव स्थिर असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बाजारपेठेतील सोयाबीनची आवक कमी झाल्याचे चित्र आहे.
सोयाबीनचे आजचे दर
सोयाबीनच्या दराचा आवक वर परिणाम
सुरुवातीला सोयाबीनला ५ हजार रुपये दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणुकीवर जास्त भर दिला होता. तर टप्याटप्याने सोयाबीनची आवक सुरु होती. मात्र सोयाबीनच्या दरात वाढ होताच आवक दुपटीने सुरु झाली होती.
मात्र आता सोयाबीनचे दर घसरून ७ हजारांवर स्थिरावल्यामुळे सोयाबीनची आवक कमी होतांना दिसत आहे.
शेतकऱ्यांची आशा तुटली ?
तालुक्यातील बहुतांश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला आहे. मात्र दरवाढीच्या आशेने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवले होते. पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीनने आठ हजारांचा टप्पा ओलांडला होता.
पुन्हा सोयाबीनच्या दरात घसरण होऊन सोयाबीनचे दर प्रति क्विटल ७ हजार झाले आहे. तरीही अनेक शेतकरी सोयाबीनच्या दरात वाढ होईल असा अंदाज व्यक्त करत आहेत.
उन्हाळी सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढली
सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल ७ ते ८ हजारांच्या घरात गेल्याने काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. १०० दिवसांच्या वाणाला ४५ दिवसानंतर तर १२० ते १४० दिवसांच्या वाणाला ७० ते ८० दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अजूनही सोयाबीनला म्हणावी अशी फूलकळी आलेली नाही. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत.