लाल कांद्यापेक्षा पांढरा कांदा खातोय भाव, जाणून घ्या आजचे दर
गेल्या आठ्वड्यापासून लाल कांद्याचे सरासरी दर हे हजार रुपयांच्या आतच राहिले तर उन्हाळी कांद्याचे सरासरी दर हे हजार रुपयांच्या आसपास होते. प्रत्येक वर्षी लाल तसेच उन्हाळी कांद्याची विक्रीची वेळ एकदाच येत असल्यामुळे लाल कांद्याचे दर पडत असतात.
त्यामुळे उन्हाळी कांद्यास देखील मुबलक असे दर मिळत नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे लाल कांदा संपल्यास उन्हाळी कांदयाची विक्री करण्याचे आवाहन शेतकरी अभ्यासकांकडून करण्यात येत आहे.
हे ही वाचा (Read This) खरिपात शेतकऱ्यांची बी-बियाणे आणि खते यात फसवणूक होऊ नये, यासाठी केंद्राचे राज्यांना आवाहन
जाणून घ्या आजचे दर
पांढऱ्या कांद्याच्या दरात तेजी
अलिबाग येथील पांढऱ्या कांद्याची काढणी सुरु झाली असून बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे. लहान पांढरा कांदा १५० रुपये माळ तर मोठा कांदा २५० रुपये माळ अशा दराने सध्या हा कांदा विकला जात आहे. या पांढऱ्या कांद्याची मागणी जास्त तर पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे याचे दर चढे असल्याचे निदर्शनास येत आहे. या वेळेस अलिबाग तालुक्यात २२७ हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे.
हे ही वाचा (Read This) या पिकाची लागवड करून बाराही महिने कमवा लाखों रुपये
पांढऱ्या कांद्याचे उत्पादन हे सेंद्रिय पद्धतीने घेतले जाते. तर यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील मोठ्या संख्येने मागणी आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सावध भूमिका
लाल आणि उन्हाळी कांदा दोन्ही बाजारामध्ये ओबतच विक्रीसाठी आल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण होत आहे.
आता शेतकऱ्यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये थोडी वाढ होतांना दिसून येत आहे. त्याचबरोबर नाफेड ने देखील काही प्रमाणात का होईना कांदा खरेदी करण्यास सुरुवात केल्यामुळे आता कांद्याच्या दरात अधिक वाढ होईल अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.
हे वाचा : एसटी कर्मचारी कामावर परतण्यास सुरवात