कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी करायचं काय? उन्हाळी कांदा काढणीला पण भाव नसल्याने चिंतेत भर!
मागील एका महिन्यात कांद्याच्या दरात मोठा बदल झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कांद्याचे दर १२०० रुपये प्रति क्विंटल असे होते महिन्याच्या शेवटी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून केवळ ८०० रुपये प्रति क्विंटल दर झाला आहे.
हे ही वाचा (Read This) आगळ्यावेगळ्या निळ्या रंगाच्या बटाट्याची लागवड करून मिळवा अधिक नफा
खरीप हंगामातील लाल कांदा अंतिम टप्यात आहे. उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरू झाली असून जानेवारी महिन्यापेक्षा आवक कमी असताना देखील दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याची मागणी नसल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पुण्यातील खेड, सोलापूर आणि लासलगाव या मार्केटमध्ये देखील सारखीच परिस्तिथी आहे.
२० हजार कट्ट्याची आवक खेड बाजार समितीत
कांद्याची मुख्य बाजारपेठत सर्वसाधारण कांद्याची आवक सुरू आहे. येथील समितीच्या महात्मा फुले मार्केट मध्ये कांद्याची आवक सुरू झाली असून ही आवक अधिक नसतानाही कांद्याला केवळ ९०० ते १३०० दर मिळाला. कांद्याच्या दरात झालेली घसरण शेतकऱ्यांनासाठी चिंतेची बाब आहे. अजूनही उन्हाळी कांदा शेतात आहे. उद्या आवक वाढली तर कांदा दराचे काय होणार याची धास्ती शेतकऱ्यांना लागली आहे.
हे ही वाचा (Read This) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग
कमी उत्पन्न खर्च मात्र जास्त
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एक महिन्यांपूर्वी कांदा विक्री केला, त्यांना सरासरी २ ते ३ लाखाचे उत्पन्न झाले आहे.
आवक घटूनही मागणी कमी आहे. त्यामुळे ५०० ते ७०० रुपयांपासूनच सौद्याला सुरवात होत आहे. अशी परिस्थिती लासलगाव, सोलापूर मार्केटमध्ये आहे. यामुळे कांद्याचे दर कधी वाढणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे कांदा वावरात ठेवणेही धोक्याचेच आहे.
सोलापुरात केवळ १५ क्विंटललाच अधिकचा दर
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सोलापूर कांदा मार्केट हे महत्वाचे आहे. त्यानुसार गुरुवारी ३७ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. परंतु केवळ १५ क्विंटल कांद्याला १ हजार ५०० चा दर मिळाला. उर्वरीत कांदा ८०० रुपये प्रती क्विंटलने विकावा लागला होता. असे असले मार्चनंतर दर वाढण्याची शक्यता आहे.