इतर बातम्या

Weather Forecast: राज्यात पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Shares

गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये बरसणाऱ्या अवकाळी पाऊस आता मराठवाड्याकडे वळताना दिसत आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि आता विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली आहे. रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांची काढणी झाली असली तरी उन्हाळी कांदा, कलिंगड यासह इतर हंगामी पिकांचे नुकसान होत आहे.

हे ही वाचा (Read This) शेतीसाठी गाळमाती वापरतांना काय घ्यावी काळजी?

आता पुढील ५ दिवस राज्यात तीव्र हवामान सक्रिय राहण्याची दाट शक्यता आहे, असे के. एस. होसळीकर यांनी ट्विट केले आहे.

  • येत्या 5 दिवसात राज्यात तीव्र हवामान सक्रिय राहण्याची दाट शक्यता.
  • कोकण, मध्य महाराष्ट्र, लगतच्या मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे,पावसाची शक्यता.
  • तसेच 2,3 दिवसांनंतर काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता.

अवकाळीचा फटका पिकांबरोबर जनावरांना देखील बसला

अवकाळी पावसामुळे अंब्यासह इतर फळबागांचे नुकसान झाले आहे. सोबतच उन्हाळी बाजरी, ज्वारी, यासारख्या पिकांना देखील पावसाचा फटका बसला आहे. गारपिटीच्या पावासामुळे पिकांचे नुकसान झाल्याने, बळीराजा संकटात सापडला आहे. दुसरीकडे राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे.

सध्या कांद्याची काढणी आणि छाटणीची कामे सुरु असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काढून वावरात टाकलेल्या कांद्याचे तर नुकसान होतच आहे पण उभ्या पिकालाही फटका बसलेला आहे. हिंगोलीसह जिल्ह्यातील काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे हळद, कांदा बीज यासह इतर हंगामी पिकांचे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा (Read This) जनावरांचे चारा व्यवस्थापन कसे करावे? एकदा वाचाच

विजेच्या कडकडाटासह होत असलेल्या पावसाचा दुहेरी फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे पिकांचे तर नुकसान सुरुच आहे पण दुसरीकडे वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जनावरेही दगावली आहेत.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवारी पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. पावसासोबतच गारपीट देखील झाली. सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैरान आहेत.

हे ही वाचा (Read This राज्यात वीज टंचाई ; भारनियमन अटळ

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *