आताची UPDATE सोयाबीनचे दर ‘मैं झुकेगा नही ‘ आतापर्यंचा उचांकी भाव !
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मागील ४ महिन्यांपासून सोयाबीनच्या दरवाढीच्या अपेक्षेने साठवणूक करून ठेवली होती. खरीप हंगामात सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे सर्वकाही बाजारपेठेच्या दरावर अवलंबून होते. शेतकरी अनेक दिवसापासून सोयाबीनच्या दर वाढीची वाट बघत होते. आता दरात वाढ होतांना दिसून येत आहे तर सध्या ६ हजार ८३० असा दर सोयाबीनला मिळत आहे.
३ दिवसातच ३०० रुपयांनी वाढ लवकरच पार करणार ७ हजार
मागील काही दिवसांपूर्वी सोयाबीनला अगदी कवडीमोलाचा दर मिळत होता. मात्र १५ दिवसांपासून दरात वाढ होऊन दर हे ६ हजार ५०० वर स्थिर होते. त्यामुळे आता दरात अजून वाढ होणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. मात्र शेतकऱ्यांनी संयमाने निर्णय घेऊन संपूर्ण सोयाबीन विक्रीस न काढता टप्याटप्याने विक्री करणे सुरु ठेवले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ६ हजाराचा आकडा पार केला असून आता लवकरच ७ हजाराचा आकडा पार करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
परदेशात उत्पादन कमी त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढण्याची शक्यता
मागील ४ महिन्यांपासून साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या दरात आता वाढ होतांना दिसत आहे. तर यंदा उत्पादनात चांगली घट झाली होती. आता ब्राझील तसेच चीनमध्ये देखील सोयाबीनच्या उत्पादकतेत घट झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढली आहे.
सबर का फल मिठा होता है…
सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या दरात सतत चढ उतार होत असतानाचे चित्र आपल्याला बघायला मिळाले. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीपेक्षा सोयाबीन साठवणुकीवर जास्त भर दिला होता. त्यामुळे सोयाबीनच्या दरात थोडी वाढ झाली होती मात्र त्यानंतर पुन्हा सोयाबीनचे दर घसरले होते.आता सोयाबीनच्या अंतिम टप्यात असून साठवणुकीचा फायदा आता सोयाबीन शेतकऱ्यांना होतांना दिसत आहे.शेतकऱ्यांना सोयाबीनच्या अधिक विक्रमी दराचा फायदा घ्यायचा असेल तर अजून काही काळ त्यांनी प्रतीक्षा करावी असे व्यापारी अग्रवाल यांनी सांगितले आहे.