उज्वल भविष्यासाठी करा बांबू शेती!
बांबूच्या शेती मध्ये चीनचा पहिला आणि भारताचा दुसरा क्रमांक लागतो.शेतीकामासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच शेतीस अवेळी होणारी पाणीटंचाई यांवर मात करण्यासाठी व शेती फायदेशीर होण्यासाठी एक शाश्वत उपाय म्हणजेच बांबूची शेती होय. परंतु मागच्या काही वर्षाचा विचार केला तर बळीराजा बांबू शेती करायला फारशी रुची काही दाखवत नाही. आणि म्हणूनच भारत सरकारने राष्ट्रीय बांस मिशन योजनेअंतर्गत बांबू शेतीला प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेतले आहे. ह्या योजने अंतर्गत भारत सरकार बांबू शेतीसाठी शेतकऱ्यांना ५०००० रु. सबसिडी देते तसेच छोट्या शेतकऱ्यांना एक बांबूच्या झाडामागे १२० रु. देण्याचे प्रावधान ह्या योजनेत करण्यात आले आहे.नॅशनल बांबू मिशन अनुसार भारतात सध्या १३६ प्रकारच्या बांबूच्या जातींची शेती केली जाते. यामध्ये १२५ स्वदेशी जाती व ११ विदेशी जातींचा समावेश आहे.बांबूची शेती तीन ते चार वर्षात तयार होते. शेतकरी चौथ्यावर्षापासून बांबूची तोडणी करू शकतात.
बांबू शेतीचे फायदे –
१. बांबू हा जलद वाढणारा गवताचा प्रकार असून त्यांच्या लवचीक व दणकट गुणधर्मामुळे त्याला फार महत्व आहे.
२. एकदा बांबू लावल्यानंतर त्याचे जीवनचक्र साधारणपणे ४० वर्षांपर्यंत चालू राहते व ४ ते ५ वर्षांपासून सतत नियमितपणे बांबूचे उत्पादन मिळत राहते.
३. बाबूपासून कागद, चटया, दांडया, टोपल्या, खोकी, पत्रे, फर्निचरआदि उत्पादने तयार होतात . यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते .
४. बांबू शेतीसाठी कुठल्याही प्रकारची बागायती, सुपीक जमिनीची आवश्यकता नसते. याची शेती कोणत्याही जमिनीत केली जाऊ शकते.
५. देशाच्या पहाडी क्षेत्रात बांबूचा वापर घर बांधणीसाठी व घराच्या साधणासाठी केला जातो. ६. ह्याव्यतिरिक्त बांबूचा वापर फर्निचर,कापडं, हर्बल औषध,हॉटेल्स इत्यादी क्षेत्रात बांबूचा वापर उल्लेखनीय आहे.
७. तसेच अनेक सजावटीचे सामान, घर सामान,अशा अनेक प्रॉडक्ट बनवण्यासाठी बांबूला प्राधान्य देण्यात येत आहे.
नॅशनल बांबू मिशनची उद्दिष्ट्ये –
१. उद्योगासाठी गुणवत्तापूर्ण कच्च्या मालाच्या आवश्यकतेच्या पूर्तीसाठी बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणे.
२. शेतकऱ्यांच्या शेतात व घराजवळ बांबूच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे.
३. सामुदायिक जमीन,शेतीयोग्य कोरडं जमीन,आणि नदी-नाल्यांजवळ बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे.
४. वनरहित शासकीय तसेच खाजगी क्षेत्रात बांबूच्या लागावडीत वाढ घडवून आणणे.
५. कृषी उत्पन्नाला पूरक म्हणून लागवड तसेच जमीन आणि हवामान व पर्यावरण समतोल राखणे .
उत्पादन आणि नफा –
१. भारत सरकारच्या कृषी विभागाच्या वेबसाईटनुसार भारत दरवर्षी १३.९६ टन बांबूचे उत्पादन करत आहे.
२. बांबूची लागवड एकदा केली तर ते ४०-५० वर्ष फायदा देणारेच आहे.
३. जवळपास एवढी वर्षे बांबू जिवंत राहू शकतो. प्रत्येक कापणीनंतर बांबूचे झाड नव्याने वाढायला सुरवात होते.
४. बांबू शेतीतून दरवर्षी हेक्टरी ३-४ लाखांचे उत्पन्न सहजरीत्या मिळून जाते.
५. सरकारच्या ह्या मिशन अंतर्गत ग्रामीण अर्थाव्यवस्थेला परत पुनःरुज्जीवीत करण्याचं काम सुरु आहे.
६. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पाऊल उचललं जातं आहे.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
https://nbm.nic.in
तर अश्या प्रकारे बांबूच्या शेती चे फायदे आहेत आणि आपण नफा मिळवू शकतो.