उडीद लागवड पद्धतीची संपूर्ण माहिती
उडीद डाळीपासून इडली, डोसा , मेदुवडा सारखे अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात. उडीद डाळ अत्यंत पौष्टिक आणि शीतल असते. खरीप हंगामातील महत्वाच्या पिकांमध्ये उडीद डाळीचा समावेश होतो. उडीद हे पीक ७० ते ७५ दिवसांमध्ये येते.कमी पावसात देखील हे पीक घेता येते.
जमीन –
१. उडीद पिकास भारी ते मध्यम जमीन उत्तम ठरते.
२. चांगला निचर्चा होणारी जमीन निवडावीत.
३. पाणी साठून राहणारी , चोपण जमिनीत हे पीक घेणे शक्यतो टाळावेत.
पूर्वमशागत –
१. उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमीन नांगरून घ्यावी.
२. जमीन चांगली तापल्यास पावसाळा सुरु होताच कुळवाच्या पाळ्या मारून जमीन सपाट करून घ्यावी.
३. जमिनीवरील धसकटे वेचून घ्यावेत.
४. पाच टन शेणखत प्रति हेक्टरी टाकावेत.
पेरणी-
१. उडीद पिकाची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलै च्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.
२. पेरणीस उशीर करू नये अन्यथा उत्पादनात घट होते.
बियाणे-
१. उडीद पिकास १० ते १५ किलो प्रति हेक्टरी बियाणे पुरेसे आहे.
२. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो प्रमाणे १ ग्रॅम बाविस्टीन , २ ग्रॅम थायरम चोळावेत. ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बीजप्रक्रिया करावी जेणेकरून बुरशीजन्य रोगापासून पिकाचे संरक्षण होईल.
पेरणी –
पेरणी करतांना ४५ x १० सेमी अंतर ठेवावेत.
आंतरमशागत –
१. पेरणी केल्यानंतर सुरवातीच्या महिन्यात तण नियंत्रणासाठी २ कोळपण्या व खुरपणी करावीत.
२. उडीद पीक तूर , कपाशी , ज्वारीत आंतरपीक म्हणून घेता येते.
काढणी –
१. बहुतांश शेंगा थोड्या पक्व दिसल्या की पाऊसाचा अंदाज घेऊन तोडणी करून घ्यावी.
२. तोडणी केल्यानंतर त्या शेंगा व्यवस्थित पसरवून उन्हात वाळवाव्यात.
३. त्यांनतर काठीने बडवून किंवा ट्रॅक्टरने मळणी करून हवा खेळती राहील अश्या वातावरणात साठवून ठेवाव्यात.
उत्पादन –
उडीद चे हेक्टरी १० ते १२ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
उडीद पिकाची लागवड वेळेवर केल्यास जास्त उत्पादन मिळून नक्कीच याचा फायदा होईल.