हळदीला चढला सोन्याचा रंग,मिळाला ३२ हजार उच्चांकी दर
महाराष्ट्रात हळदीचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जात असून सांगलीमध्ये हळदीला सर्वोच्च दर मिळाला असून सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे गुरुवारी हळद सौदा झाला असता तेथे राजापुरी हळदीस ३२ हजार रुपये क्विंटल असा उच्चांकी दर मिळाला असून ही हळद मनाली ट्रेंडिंग कंपनी ने खरेदी केली आहे.
बाजारसमितीमध्ये झालेल्या सौद्यात प्रति क्विंटल कमीत कमी ९ हजार तर जास्तीत जास्त ३२ हजार दर मिळाला असून सरासरी दर हा १४ हजार रुपये इतका मिळाला. त्यामुळे आता अनेकांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपली हळद विक्रीसाठी धाव घेतली आहे.
हळद लागवडीमध्ये हिंगोली जिल्हा आघाडीवर असून हिंगोली बाजारपेठेमध्ये गुजरात, कर्नाटक या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात हळद निर्यात केली जाते. राज्यात ८४ हजार हेक्टर क्षेत्र हळद लागवडीखाली असून यातील ४९ हजार हेक्टर क्षेत्र एकट्या हिंगोली राज्यातील आहे.
शेतकऱ्यांसाठी चालू असणारी शासनाची हळद, बेदाणा शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, सचिव महेश चव्हाण यांनी केले.