टोमॅटोपेक्षा दारू स्वस्त !
हो, तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात. गोव्यामध्ये एकीकडे बियर ६० रुपयांना मिळत आहे तर दुसरीकडे पेट्रोल बरोबर टोमॅटोचे दर १०० रुपयाच्या पुढे गेले आहे. अतिवृष्टी नंतर अवकाळी पडलेल्या पावसामुळे भाजीपाला सडला असून त्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. जवळजवळ सर्वच जण या महागाईला तंगले आहेत.
७० रुपये प्रति किलो पासून टोमॅटोची विक्री थेट १०० रुपये किलो पर्यंत होत आहे. तर एका बियर ची किंमत ही ६० रुपये आहे. त्यामुळे टोमॅटो खरेदीमध्ये घसरण होत आहे. टोमॅटोचे असेच भाव राहिले तर पेट्रोल, डिझेल मध्ये देखील अधिक दर वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच पेट्रोल ९६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८७ रुपये लिटर आहे.
गोव्यामध्ये दारूवर सर्वात कमी टॅक्स लावला जात असून केंद्र व राज्यसरकारने तेलावर जास्त टॅक्स लावला आहे. त्यात आता भाजीपाल्याचे भाव आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हसावे की रडावे असा प्रश्न पडला आहे.