कांद्याच्या दराने घेतली भरारी, केंद्राच्या या निर्णयामुळे होणार नुकसान ?
कांद्याच्या आवक मध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली असता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार काही दिवस बंद करण्यात आले होते. मात्र याचा काहीही परिणाम कांदा दरावर झाला नसून कांद्याला यंदा २ वेळेस विक्रमी भाव मिळाला आहे.
महाराष्ट्रामध्ये कांद्याची आवक आता वाढली असली तरी त्याचा काहीही परिणाम दरावर होत नसून दरात वाढ होतांना दिसत असल्यामुळे आता केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करत आहेत. कांदयाचे दर नियंत्रणात यावे यासाठी साठवणूक केलेला कांदा आता बाजार समित्यांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कांदयाला सध्या ३ हजार ५०० असा दर मिळत आहे. तर चांगल्या प्रतीच्या कांद्यास ३५ रुपये किलो प्रमाणे दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
केंद्र सरकारने काय घेतला निर्णय ?
मागील महिन्यात कांदयाच्या कमी उत्पादनामुळे दरात वाढ होणे साहजिक होते. मात्र आता खरीप हंगामातील कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असतांना देखील कांद्याचे दर हे टिकून आहे. कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करत आहेत. कांदयाचे दर नियंत्रणात यावे यासाठी साठवणूक केलेला कांदा आता बाजार समित्यांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. लासलगाव पाठोपाठ सर्वात मोठी असलेल्या बाजारपेठेत कांद्याची आवक सध्या कमी झाली असली तरी दर मात्र अजूनही टिकूनच आहे.
कांद्याची जोरदार आवक …
पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा मधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती हा एक नवा पर्याय झाला आहे. खरिपातील कांदा अंतिम टप्यात असतांना देखील प्रत्येक दिवशी ३०० ते ४०० ट्रकमधून कांदयाची आवक होत आहे. या सोलापूर बाजारसमितीमध्ये कांद्यास १०० रुपये प्रति क्विंटल पासून ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे.