सरकार या योजनेतील पैसे घेणार परत अकाउंटही करणार सील ?
सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असून शेतकऱ्यांना आवश्यक असणारी अवजारे तसेच शेती कामासाठी कश्याप्रकारे मदत करता येईल या साठी प्रयत्न करत असते. सर्व योजना, उपक्रम गरीब तसेच गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहचावेत यासाठी प्रयत्न करत असते. मात्र अनेक नागरिक कागदपत्रांची पूर्तता करून योजनेचा लाभ घेतात. एका अहवालानंतर असे निदर्शनात आले की , देशभरातील ४ कोटी अपात्र शेतकऱ्यांकडून ही रकम वसूल केली जात आहे. बीड जिल्ह्यातील २हजार शेतकऱ्यांनी ही अपात्र रकम परत केली आहे. जानेवारी महिन्यात १० वा हफ्ता खात्यावर जमा झाला असून आता ११ व्या हफ्त्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे काम महसूल विभागाला देण्यात आले आहे.
हे ही वाचा (Read This ) Valentine Day – गुलाब उत्पादक शेतकरी ‘लाल’, आले अच्छे दिन
कोण आहेत अपात्र शेतकरी ?
अल्पभूधारक तसेच गरजू शेतकऱ्यांना ही रक्कम मिळावी हा सकारचा उद्देश राहिलेला आहे. असे असतानाही राज्यातील लाखो अपात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे. सरकारी कर्मचारी, माजी मंत्री, राज्यमंत्री विधानमंडळाचा सदस्य, महापौर, नगराध्यक्ष तसेच 10 हजारापेक्षा अधिकची पेन्शन घेणारे, आयकरचा भरणा करणारे, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, नोदणीकृत व्यवसाय करणारे हे या योजनेसाठी अपात्र असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी लाभ घेतला असेल तर त्यांना ही रक्कम परत करावी लागणार आहे. असे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा (Read This ) आता सातबारा उतारा बंद? राज्य सरकारचा निर्णय
पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव कसे नोंदवावे?
१. तुम्हाला प्रथम पंतप्रधान किसान सन्मान योजना या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे.
२. आता ‘फार्मर्स’ कॉर्नरला जा.
३. येथे आपल्याला ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
४. आधार क्रमांक समाविष्ट करावा लागणार आहे.
५. त्याच वेळी कॅप्चा कोड घालून राज्याची निवड करावी लागते आणि मग पुढची प्रक्रिया ही करावी लागणार आहे.
६. आपल्याला आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती या स्वरूपात भरणे आवश्यक आहे.
७. बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती देखील भरावी लागेल. त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म सादर करू शकता.
हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज