पिकांमध्ये झिंकचे कार्य
पिकातील ऑक्झिन्स च्या निर्मितीसाठी झिंक गरजेचे आहे. पिकाच्या शेंड्याच्या वाढीसाठी गरजेच्या इंडॉल अँसेटिक अँसिड ची निर्मिती ही झिंक पासुन होते. त्यासाठी ट्रिप्टोफॅन हे अँमिनो अँसिड कार्य करते, जे झिंक च्या वापराने तयार होते.
झिंक पिकामध्ये स्टार्च तयार करणे आणि मुळांच्या वाढीसाठी गरजेचे आहे. झिंक बिज (सीड) आणि खोडाच्या पक्वतेवर परिणाम करते. झिंक हरीतलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीत गरजेचे आहे. पिकाच्या पेशीमधिल योग्य प्रमाणातील झिंक च्या उपस्थितीमुळे पिक कमी तापमानात देखिल तग धरुन राहते. प्रामुख्याने इंडॉल असेटिक असिडच्या निर्मितीत सहकार्य करते, ज्यामुळे पिकाची शेंड्याची वा जोमदार होण्यात मदत मिळते. प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या एन्झाईम्सची निर्मिती करते. तसेच पिकामधिल शर्करेच्या वापरासाठी गरजेचे आहे.
सेंद्रिय कार्बन देखील नापीक जमीन सुपीक बनवू शकतो, शेतात वाढवण्याचा नैसर्गिक मार्ग एकदा वाचाच
जमिनीचा सामु-
१. मातीचा सामु जास्त असल्यास झिकची कमतरता जाणवते. मात्र हा नियम सर्वच ठिकाणी लागु होत नाही.
२. असिडीक स्वरुपातील झिंकचा वापर करुन हि कमतरता दुर करता येते.
झिंक आणि स्फुरद (फॉस्फोरस) चे गुणोत्तर –
१. जास्त प्रमाणातील स्फुरद मुळे झिंक ची कमतरता जाणवते.
२. नत्राची कमी प्रमाणातील उपल्बधता पिकाच्या वाढीवर करित असलेल्या दुष्परिणांमुळे ईतर अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते, हाच परिणाम झिंक वर देखिल लागु पडतो.
३. झिंक जास्त सामू असलेल्या जमिनीत उपलब्ध होत नाही. मात्र हे सर्वच जमिनींवर होत नाही.
४. झिंक सल्फेट, किंवा तत्सम अँसेडिक खतांच्या माध्यामातुन आणि मुळांच्या परिसरात झिंक देवुन हि कमतरता दुर करता येते.
५. जमिनीतील स्फुरद चे जास्त प्रमाण झिंक
चे शोषण कमी करते.
६. जमिनीतील विविध सेंद्रिय पदार्थ झिकचे विश्लेषण करतात.
७. ज्यामुळे झिंक चे कार्बोनेटस, बायकार्बोनेटस सोबत होणारे स्थिरकरण कमी होते व पिकांस उपलब्धता वाढते.
८. पिकांस नत्राची कमतरता असल्यास साहजीकच पिकाची वाढ कमी होते व त्यामुळे इतर अन्नद्रव्यांची देखिल कमतरता जाणवते. ज्यात झिंक चा देखिल समावेश होतो.
हे ही वाचा (Read This) शेतीसाठी गाळमाती वापरतांना काय घ्यावी काळजी?
९. मॅग्नेशियम च्या वापराने झिंक चे शोषण देखिल वाढते.
१०. पिकातील ऑक्झिन्स च्या निर्मितीसाठी झिंक गरजेचे आहे.
११. पिकाच्या शेंड्याच्या वाढीसाठी गरजेच्या इंडॉल अँसेटिक अँसिड ची निर्मिती ही झिंक पासुन होते.
१२. त्यासाठी ट्रिप्टोफॅन हे अँमिनो अँसिड कार्य करते. जे झिंक च्या वापराने तयार होते.
१३. मॅग्नेशियम च्या वापराने झिंक चे शोषण देखिल वाढते. मका, कापुस, फळ पिके, मधु मका, ज्वारी, कडधान्ये, हरबरा, तुर, सोयाबीन, भात या पिकांस झिंक दिल्यास उत्पादनात वाढ होते.
सेंद्रीय पदार्थ –
१. जमिनीतील सेंद्रीय पदार्थ झिंक चा पुरवठा करीत असतात.
२. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमुळे इनऑरगॅनिक स्वरुपातील जस्ताचे चिलेशन होवुन त्याची पिकास उपल्बधता वाढते.
३. जमिनीतील जास्त प्रमाणातील पाण्यामुळे झिंकची उपल्बधता कमी होते. अश्या प्रकारे पिकांमध्ये झिंक कार्य करत असते.
हेही वाचा :- सोशल मीडियावर मैत्री पडली महागात ; तरुणाने केला तरुणीवर अत्याचार